डॉ. प्रकाश संघवी यांचे वैद्यकीय आणि सामाजिक कार्य प्रेरणादायी: धनंजय महाडिक

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून गेली ३५ वर्षे प्रख्यात बालरोग तज्ञ डॉ. प्रकाश संघवी हे वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी या वैद्यकीय सेवेला सामाजिक उपक्रमाचीसुद्धा जोड दिली आहे. यातूनच त्यांनी आज कोरोना रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिले. डॉ. यांच्या या सामाजिक आणि वैद्यकीय सेवेचा आदर्श सर्वांनाच अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केले. ते ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर मशीन लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
     डॉ. प्रकाश संघवी यांनी परदेशी बनावटीचे १० ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर मशीन आज कोरोना रुग्णांच्या सेवेत माजी खासदार धनंजय महाडिक आणि  सौ.अरुंधती महाडिक यांच्या हस्ते लोकार्पण केले. यावेळी डॉ. प्रकाश संघवी, ॲड. प्रकाश हिलगे, सौ. कल्पना संघवी, स्नेहल संघवी-पुनाकर, जैनेश पुनाकर, नासिर बोरसदवाला, डॉ. गणेश खरात यांच्यासह रोटरी क्लब आणि इनरव्हील क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
     कोल्हापूर जिल्ह्यात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला. अनेक रुग्णांना ऑक्सिजनअभावी शेवटचा श्वास घ्यावा लागला. ही समस्या जाणून घेत, कोल्हापुरातील डॉ. प्रकाश संघवी यांनी परदेशी बनावटीचे १० ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर मशीन आज कोरोना रुग्णांच्या सेवेत लोकार्पण केली. यासाठी जैना युएसए माजी अध्यक्ष दिलीप शहा व रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टचे राजू मेहता, मुंबई यांचे सहकार्य लाभले.
      प्रतिमिनिट हवेतून सात लिटर्स ऑक्सिजन संकलित करण्याची क्षमता या उपकरणांची असून त्याची एकूण किंमत दहा लाख रुपये आहे. भवानी मंडपातील संघवी हॉस्पिटलमधून गरजू लोकांना हे मशीन्स कोरोना रुग्णावर औषधोपचार करणाऱ्या डॉक्टर्स किंवा हॉस्पिटलच्या शिफारशीवरून आजपासून मोफत उपलब्ध झाले आहेत. त्यासाठी डॉ. प्रकाश संघवी (मो. नं. ९६६५७३१०००) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
———————————————– 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!