कोल्हापूर • प्रतिनिधी
डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांचा आज (दि.१८) वाढदिवस. संजय पाटील यांनी वैद्यकीय व तंत्रशिक्षण, शेती, रिटेल, आरोग्य व पर्यटन अशा क्षेत्रात योगदान दिले आहे.
जिद्द, ध्येय व चिकाटीला प्रचंड मेहनतीची जोड देत शिक्षण, व्यवसाय, उद्योग, शेती क्षेत्रात नवंनवे प्रयोग करत यशोशिखरावर पोहोचलेले डॉ. संजय पाटील यांनी शिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी लावलेल्या शैक्षणिक रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. “जे करायचे ते सर्वोत्तम” या ध्येयाने प्रेरित होऊन काम करणारे डॉ. संजय डी. पाटील म्हणजे यशस्वी प्रयोगांची खाणच आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दीक शुभेच्छा!
——————————————————-