• सचिवपदी डॉ.महादेव जोगदंडे तर
खजानिसपदी डॉ.वर्षा पाटील
कोल्हापूर • प्रतिनिधी
जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन (जी. पी. ए.) ची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. जीपीएच्या अध्यक्षपदी डॉ. उषा निंबाळकर यांची तर सचिवपदी डॉ. महादेव जोगदंडे आणि खजानिसपदी डॉ. वर्षा पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ. शिरीष पाटील, डॉ. विरेंद्र कानडीकर, डॉ. राजेश सातपुते, डॉ. अरुण धुमाळे, डॉ. रमेश जाधव, डॉ. शिवराज जितकर, डॉ. विनायक शिंदे, डॉ. राजेश कागले, डॉ. सचिन मुतालिक, डॉ. अजित कदम, डॉ. राजेश सोनवणे, डॉ. पूजा पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
सल्लागार समितीमध्ये डॉ. शिवराज देसाई (चेअरमन), डॉ. शिवपुत्र हिरेमठ,
डॉ. उद्यम व्होरा यांचा समावेश असून
तज्ञ सल्लागार म्हणून डॉ. विलास महाजन, संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद घोटगे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे