सिलिका ऐरोजेल संशोधनात डॉ.विनायक पारळे जागतिक क्रमवारीत ५८व्या स्थानी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूरचे सुपुत्र व सध्या दक्षिण कोरियाच्या योन्सई विद्यापीठात रिसर्च प्रोफेसर या पदावरती कार्यरत असणारे डॉ.विनायक पारळे यांना एल्सविअर स्कोपसने घेतलेल्या सर्वेक्षणात सिलिका ऐरोजेल संशोधनामध्ये जागतिक क्रमवारीत ५८ वे स्थान मिळाले आहे. तसेच त्यांनी आशिया खंडामध्ये त्यांचा १९ वा तर दक्षिण कोरियामध्ये २ रा क्रमांक पटकाविला आहे.
      स्कोपस हे संशोधकांसाठी संशोधन लेख उपलब्ध करून देणारे जगातील सर्वात मोठे डेटाबेस आहे. यामध्ये संशोधनसंबंधी विविध निकषाच्या आधारे ही क्रमवारी प्रसिद्ध केली जाते. डॉ. पारळे यांना गेल्याच महिन्यात एडी सायंटिफिक या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात जागतिक शास्त्रज्ञांच्या क्रमवारीत स्थान मिळाले आहे. संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना सायन्स फादर या प्रतिष्ठित संस्थेकडून ” आंतरराष्ट्रीय युवा शास्त्रज्ञ” पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
     डॉ.विनायक पारळे हे सध्या दक्षिण कोरिया मधील नामवंत योन्सई विद्यापीठात रिसर्च प्रोफेसर म्हणून काम पाहत आहेत. डॉ.विनायक पारळे यांनी संशोधन क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावली आहे. ते सध्या ऐरोजेल या आव्हानात्मक पदार्थावर पुढील संशोधन करीत असून त्यांचे मार्गदर्शक डॉ. एच. एच. पार्क व टीमला पुढील संशोधनासाठी कोरियन गव्हर्नमेंटकडून १०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कोरियामध्ये पहिले ऐरोजेल मटेरियल रिसर्च सेंटर उभारले आहे. डॉ.पारळे व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.वर्षा पारळे हे या रिसर्च सेंटरचे सदस्य म्हणून काम पाहत आहेत.  
डॉ.पारळे हे १० वर्षाहून अधिक काळ संशोधन क्षेत्रात कार्य करीत आहेत त्यांनी ऐरोजेल व्यतिरिक्त सौर ऊर्जा, फोटोकॅटालायसीस, गॅस सेन्सिंग इत्यादी क्षेत्रात त्यांनी अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. याचबरोबर ऐरोजेल पदार्थाचा ड्रग डिलिव्हरीसाठी उपयोजनात्मक अभ्यास याविषयावरसुद्धा त्यांचे पुढील संशोधन युद्धपातळीवर चालू आहे. त्यांनी आतापर्यंत ६० हुन अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध केले आहेत व याचा संदर्भ जगभरातील अनेक संशोधकांनी आपल्या शोधनिबंधासाठी घेतला आहे.
डॉ. पारळे  यांचे प्राथमिक व माध्यामिक शिक्षण मडिलगे ता.भुदरगड येथे झाले. तसेच त्यांनी पदव्युत्तर व पी.एच.डी पर्यंत चे शिक्षण शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केले. पुढे त्यांनी संजय घोडावत इन्स्टिटयूट, आर आय टी इत्यादी नामवंत संस्थेमध्ये अध्यापनाचे कार्य केले. २०१६ साली ते पुढे पोस्ट डॉक्टरेटसाठी दक्षिण कोरियामध्ये योन्सई विद्यापीठात प्रा. एच. एच. पार्क यांच्या मार्गदर्शनाखाली रुजू झाले. सध्या ते तेथे रिसर्च प्रोफेसर म्हणून काम पाहत आहेत.
——————————————————-
 Attachments area

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!