शहरातील नाले सफाई व गाळ काढण्याचे काम सुरु


कोल्हापूर • प्रतिनिधी
     शहरामध्ये महानगरपालिकेच्यवतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पोकलॅन्ड, जेसीबीच्या व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. त्यामुळे यावर्षी पावसाळयापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सुचना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आरोग्य विभागास दिल्या होत्या. त्यानुसार दि.१ मेपासून कळंबा जेलमागील योगेश्वरी कॉलनी येथील ओढयातील गाळ पोकलँन्डच्या सहाय्याने काढण्याचे काम सुरु करण्यात आले.
      शहरामधील सर्वच लहान व मोठया नाल्यांची सफाई दरवर्षी करण्यात येते. यामध्ये कर्मचाऱ्यांमार्फत ४७६ लहान नाले, जेसीबीच्या सहाय्याने २३६ मध्यम नाले व चॅनल सफाई तसेच जयंती, गोमती, दुधाळी व शाम सोसायटी नाला पोकलॅन्ड मशिनच्या सहाय्याने गाळ काढण्यात येतो. महापालिकेने यासाठी ४ पोकलॅन्ड मशीन भाडयाने घेतले आहेत.  
      आत्तापर्यंत योगेश्वरी कॉलनी ते हुतात्मा पार्क, राजेंद्रनगर ते हुतात्मा पार्क, रिलायन्स मॉल ते हुतात्मा पार्क व शाहू सोसायटी ते मनोरमानगर येथील गाळ काढणे व सफाई करण्याचे काम पुर्ण करण्यात आले आहे.
      सदरचे काम पोकलॅण्ड व कर्मचारी यांच्या सहाय्याने करण्यात आले आहे. त्याचबरोबर चॅनेल सफाईसाठी महापालिकेचा १ जेसीबी व ४० कर्मचाऱ्यांची टिम तयार करण्यात आली. आजअखेर या टिमद्वारे ३४ प्रभागामधील चॅनेल सफाईची कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. उर्वरीत सर्व मोठे नाले तसेच इतर स्वरुपाचे सर्व चॅनल्स यांची स्वच्छता ३० मे २०२१ अखेर पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
     तरी शहरातील सर्व नागरिकांनी नाला अथवा नाला परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा अथवा इतर टाकाऊ पदार्थ टाकू नयेत, असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *