मराठा समाजाच्या तळमळीने मंत्री मुश्रीफ मुंबईवरून विमानाने आले कोल्हापूरला

Spread the love

      
•पिठलं-भाकरी खाऊन पुन्हा परतले मुंबईला
कोल्हापूर • प्रतिनिधी
     सकल मराठा समाजाच्या कोल्हापुरातील आंदोलनाला उपस्थित राहण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ खाजगी विमानाने कोल्हापूरला आले आणि दोन तासानंतर पुन्हा त्याच विमानाने मुंबईला रवाना झाले.
     सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि लोकप्रतिनिधी या नात्याने आपली भूमिका मांडण्यासाठी मंत्री श्री. मुश्रीफ आले होते. कोल्हापुरात सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे श्री. मुश्रीफ सुरुवातीला मुंबईवरून निघून बेळगावमध्ये विमानाने पोहोचणार होते. तिथून मोटारीने कोल्हापूरला येणार होते. साडेदहानंतर पाऊस थांबल्यामुळे वातावरण स्वच्छ झाल्यानंतर साडेअकरा वाजता विमान कोल्हापुरात उतरले. राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळावर समाधीला अभिवादन करून श्री. मुश्रीफ यांनी आपली भूमिका मांडली. या आंदोलनात ‘मराठा समाजाला शिक्षणासह नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे आणि या समाजाला समान संधी मिळाल्याच पाहिजेत’, ही आग्रही भूमिका मंत्री श्री. मुश्रीफ यांनी मांडली.
           उभ्या-उभ्याच भाकरी आणि पिठलं खाऊन मुंबईला रवाना…..
     मूक आंदोलनातून बाहेर पडताच मंत्री श्री. मुश्रीफ कसबा बावडा येथील शासकीय विश्रामगृहावर पोहोचले. उभ्या-उभ्याच भाकरी आणि पिठलं खाऊन ते सव्वा एक वाजता उजळाईवाडी विमानतळाकडे रवाना झाले. दुपारी दीड वाजता विमान मुंबईकडे झेपावले. कारण, आजच मुंबईत मंत्रिमंडळाची महत्त्वाची कॅबिनेटही आहे.
———————————————– Attachments areaReplyForward
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!