कोल्हापूर • प्रतिनिधी
युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मेन राजाराम कॉलेजच्या अँपीथिएटरमध्ये दुर्ग परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजन समितीच्यावतीने देण्यात आली. यावेळी फत्तेसिंह सावंत, सुखदेव गिरी, विनायक फाळके, राम यादव, संजय पवार,अजय पाटील आदी उपस्थित होते.
दुर्गसंवर्धन संस्थांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर उपाय योजना करणे या परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रातील जवळपास २५० हून अधिक संस्था दुर्गपरिषदमध्ये सहभागी होणार आहेत. या परिषदेकरिता युवराज संभाजीराजे छत्रपती आणि यौराज शहाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार आहेत.
गेली दीड दशके खासदार संभाजीराजे छत्रपती हे गडकिल्ल्यांच्या संवर्धन आणि जतन करण्याकरिता कार्यरत आहेत. सर्व गडप्रेमी आणि दुर्ग संवर्धन संस्थाना एकत्र आणण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. दोन वर्षांपूर्वी रायगड किल्ल्यावरदेखील दुर्गपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच पुढचा भाग म्हणून या परिषदेकडे पाहिले जात आहे