डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ कृषी क्षेत्रात क्रांती घडवेल: शरद पवार

Spread the love

• तळसंदे येथील नव्या विद्यापीठाचा व्हर्च्युअल शुभारंभ
कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्हा हा शेतीबाबत अतिशय जागृत असेलेला जिल्हा असून आजपर्यत शेती विकासात खूप मोठे योगदान दिले आहे. राजर्षी शाहू महाराजांनी शेतीला आधुनिकतेची जोड देत राज्य व देशालाही नवी दिशा दिली. याच जिल्ह्यात तळसंदे येथे सुरु होत असलेले डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याच्याही कृषी क्षेत्रात क्रांती घडेवेळ असा विश्वास माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.
     तळसंदे येथील डी. वाय. पाटील. कृषी व तंत्र विद्यापीठाचे गुरुवारी शरद पवार यांच्या हस्ते मुबाईत झालेल्या कार्यक्रमात व्हर्च्युअल उद्घाटन झाले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक व माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील होते. 
     यावेळी बोलताना पवार म्हणाले,
देशातील ५८ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेतीचे अर्थकारण सुधारल्याशिवाय समाजातील शेवटच्या घटकाची उन्नती होणार नाही. ग्राहकाची खरेदी करण्याची क्षमता वाढली तरच शेती आणि शेतकरी बळकट होईल. पाण्याचा प्रत्येक थेंब  वाचवून त्याचा योग्य वापर करा, माती जतन आणि संवर्धन याचबरोबर नवनवीन बी-बियाणे आणि खतांचे संशोधन या त्रिसूत्रीचा वापर केल्यास कृषी उत्पादनात मोठी झेप घेता येईल. तळसंदेतील नव्य विद्यापीठाने यावर काम केल्यास शेती व शेतकऱ्याचा चेहरा मोहरा बदलता येईल असे पवार यांनी यावेळी सांगितले.
     जीन्समध्ये बदल करून तयार होणाऱ्या बियाण्यापासून अधिक उत्पादन मिळते, मात्र अशी जीएम बियाण्याबाबत युरोप आणि अमेरिकेत एका बाजूला विरोध करून चळवळी उभारतात आणि दुसऱ्या बाजूला हेच देश यातून भरमसाठ उत्पादन घेत आहेत. हा विरोधाभास लक्षात घेता, आपल्याही देशाने जे जे शक्य आहे ते सर्व संशोधन करावे, आणि जीएम सारख्या बियाण्यांचा वापर करून स्वयंपूर्ण होण्याची गरज आहे. देशात कृषी संशोधनासाठी ८० संस्था आणि पाच हजार शास्त्रज्ञ कार्यरत आहेत. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग  शेतकरी यांना व्हावा यासाठी डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठाने समन्वय साधत हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी मध्यस्थाची भूमिका बजावावी.
      पाणी, माती आणि अधिक उत्पादन यासाठी इस्रायली तंत्रज्ञान जगात अव्वल असले तरी फळ, भाज्या, फुले, दूध या उत्पादनात नेदरलँडला तोड नाही. विद्यापीठाने इजराइलसोबत करार केला आहे. नेदरलँड, चीन, बँकॉक आदि कृषी क्षेत्रात अव्वल असणाऱ्या विद्यापीठांची संलग्न व्यवहार करावेत. त्यासाठी आपण  मदत करू. राज्याच्या उभारणीत आणि प्रगतीमध्ये चार कृषी विद्यापीठांचे मोठे योगदान आहे. यापुढे डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठ नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वेगळा ठसा उमटवेल असा विश्वास आहे.  शेती तंत्रज्ञान अधिक प्रगत होण्यासाठी हे विद्यापीठ हातभार लावणारे ठरेल याबाबत मला शंका नाही.
     जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नव्या संशोधनला या विद्यापीठामुळे चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करत डॉ. संजय पाटील व मंत्री सतेज पाटील ही बंधूंची जोडी या विद्यापीठाला नव्या उंचीवर पोहचवेल असा विश्वास व्यक्त केला.
      महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हे विद्यापीठ कृषी क्षेत्र विकसातील नवे दालन ठरेल. शेतकऱ्याचे जीवन समृध्द करण्यासाठी काम करेल असा विश्वास व्यक्त केला.
       उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी खासगी खेत्रातील या पहिल्या कृषी विद्यापीठाचे शुभारंभाचा साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. या संस्थाचालकांचा नम्रपणा सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन करतान विद्यापीठच्या प्रगतीसाठी सर्वागीण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
      ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी डॉ. संजय पाटील यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करताना हे विद्यापीठ ते नव्या उंचीवर नेतील याची  खात्री असल्याचे सांगितले. कोल्हापूरची भूमी हि शेतीची, संशोधांची भूमी असून या विद्यापीठाच्या माध्यमातून हे कार्य अधिक गती घेईल असा विश्वास व्यक्त केला.
          सर्वोत्कृष्ट विद्यापीठ बनवणार: डॉ. संजय पाटील…..
     डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी ग्रुपचा व नव्या विद्यापीठाचा प्रवास यावेळी उलगडून दाखवला. आमच्या ग्रुपच्या अन्य संस्था व विद्यापीठाप्रमाणे तळसंदे येथील नवे विद्यापीठ हे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखले जाईल याची खात्री देतो. येत्या १० वर्षात या विद्यापीठात १६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असतील तसेच ‘नॅक’ अ श्रेणीसह विविध मानके प्राप्त करेल अशा प्रकारे हे विद्यापीठ वाटचाल करेल. येत्या काही वर्षात देशातील नावाजलेले कृषी व तंत्र विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाची ओळख बनेल, यासाठी आम्ही सर्वजण मेहनत घेऊ असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
     यावेळी कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खा. संजय मांडलिक, आ. राजू आवळे,  गृहराज्यमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आ. ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील, देवश्री पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, आकुर्डी येथील डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. प्रभात रंजन, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, तळसंदे विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल सोलापूरकर  यांनी केले. संस्थेचे विश्वस्त आ. ऋतुराज पाटील यांनी आभार मानले

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!