नवनाथ पडळकर यांना डी.वाय. पाटील विद्यापीठाची पीएच.डी.

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या “सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी स्टडीज”चे विद्यार्थी नवनाथ पडळकर यांना विद्यापीठाकडून पीएच.डी. जाहीर झाली. पडळकर यांनी फिजिक्स (पदार्थ विज्ञान) विद्याशाखेतील “निकेल क्रोमियम लेयर्ड डबल हायड्रॉक्साइड हायब्रीडाइझड विथ पॉलीऑक्सो मेटालेट अनाईन्स अँड ग्राफीन ऑक्साईड नॅनोशीट्स फॉर सुपरकॅपॅसिटर एप्लीकेशन” या विषयावरील शोधनिबंध सादर केला.
      नवनाथ पडळकर यांनी आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये १३ हुन अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. याचबरोबर त्यांची ४ इंडियन पेटंट देखील प्रसिद्ध झाली असून त्यामधील एका पेटंटला भारत सरकारकडून मान्यता प्राप्त झाली आहे. नवनाथ पडळकर यांना डॉ. जे. एल. गुंजकर यांचे मार्गदर्शन लाभले.
     ऊर्जा टंचाईच्या अलीकडच्या काळात, नवीकरणीय उर्जा स्त्रोतांपासून ऊर्जा मिळवून ती ऊर्जा विजेचा रूपात साठवून विविध कारणासाठी उपयोगात आणता येते. विदयुत ऊर्जा साठवण्यासाठी सुपरकॅपॅसिटर हे सर्वात कार्यक्षम ऊर्जा साठवण उपकरण आहे. येणाऱ्या काळात सुपरकॅपॅसिटर हे बॅटरीला पर्याय म्हणून वापरता येईल. डॉ. पडळकर यांनी ऊर्जा साठवण्यासाठी लागणारे नॅनोमटेरिअल्स वेगवेगळ्या रासायनिक पद्धतींचा उपयोग करून बनविले आहेत.
      त्यांच्या लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेत त्यांनी जिद्द, चिकाटी व संयम या त्रयीच्या जोरावर यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!