असंघटित कामगारांसाठी ई-श्रम कार्ड योजना: ८५ नागरिकांनी केली नोंदणी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून समाजातील प्रत्येक घटकासाठी नवनवीन योजना राबवण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून देशातील असंघटीत क्षेत्रातील कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ई-श्रम पोर्टल सुरू केले आहे. रविवारी जरगनगर येथे भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या संपर्क कार्यालयात या ई-श्रम कार्ड नोंदणीसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ८५ नागरिकांनी नोंदणी करून ई-श्रम कार्ड काढून घेतले.
      यामध्ये गवंडीकाम, फॅब्रिकेशन, रिक्षा, फेरीवाले, भाजी विक्रेते, ब्युटी पार्लर, टेलरिंग, फरशी फिटिंग अशी कामे करणाऱ्या लोकांनी नोंदणी करून घेतली. या योजनेला मिळालेला प्रतिसाद पाहता ई-श्रम कार्ड काढण्याचा उपक्रम पुढील एक आठवडा सुरु राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी सांगितले.
     या उपक्रमासाठी किशोर माने, विजय पाटील, सचिन साळोखे, कृष्णात आतवाडकर यांनी विशेष प्रयत्न केले.
     केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या देशातील करोडो लोकांसाठी ई-श्रम कार्ड सुरू केले आहे. या कार्डच्या माध्यमातून ई-श्रम कार्डधारकांना सरकारकडून बरीच मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर अनेक योजनांचा लाभ मिळणार आहे. या कार्ड नोंदणीसाठी आधारकार्ड आणि आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक एवढ्याच गोष्टीची आवश्यकता आहे.
     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेच्या माध्यमातून देशामध्ये अनेक व्यवहार डिजिटल माध्यमातून सुरू झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरी व असंघटित क्षेत्रातील अनेक कामगारवर्गाला भविष्यामध्ये केंद्र शासनाच्या अनेक योजनांचा लाभ होण्यासाठी, होणारी मदत त्यांच्या खात्यावर थेट जमा होण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी याप्रसंगी केले.
     या योजनेचा आणखीन एक फायदा म्हणजे पीएम सुरक्षा विमा योजनेचा लाभ या माध्यमातून कार्डधारकाला मिळणार आहे. ज्या अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत अपघाती विमाचे संरक्षण असेल यामध्ये सरकारकडून एक वर्षाचा प्रीमियम दिला जाणार आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!