विद्युतीकरणाच्या कामात आर्थिंग ही प्राणवायू : दिपक पाटील


 कोल्हापूर • प्रतिनिधी
     विद्युतीकरणाचे काम करताना आर्थिंग ही प्राणवायु आहे. तेंव्हा आर्थिंग करूनच वीजक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी विद्युत यंत्रणेच्या देखभाल-दुरूस्तीचे काम करावे, असा सल्ला कोल्हापूर ग्रामीण विभाग १ चे कार्यकारी अभियंता दिपक पाटील यांनी कोगे कक्षातील कर्मचारी व कुटुंबियांसाठी आयोजित विद्युत सुरक्षा कार्यशाळेत बोलताना दिला.
      श्री.पाटील यांनी महावितरणसाठी प्रत्येक कर्मचारी हा संसाधन आहे. तर आपल्या कुटुंबाची जबाबदारी ही आपल्यावर आहे, याची जाणिव ठेवून  विद्युत कर्मचाऱ्यांनी सुरक्षा साधनांचा वापर करूनच आपले काम करावे, असे सांगितले. ताण-तणावमुक्त कार्यशैली व जीवनशैली अंगिकारण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
     यावेळी सहाय्यक अभियंता रश्मी पाटील यांनीही विद्युत सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी संदिप बाणदार, विशाल चव्हाण, विश्वजित नाईक, प्रकाश चौगुले, स्नेहल सुतार यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक  कनिष्ठ अभियंता आर. एस. कांबळे यांनी तर आभारप्रदर्शन प्रधान तंत्रज्ञ एम.ए. वेदांते यांनी केले.
———————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *