कोल्हापूर • प्रतिनिधी
बानगे (ता.कागल) येथील पूरबाधित गल्ल्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. बानगे गावाला भेट देऊन मंत्री मुश्रीफ यांनी पूरबाधित कुटुंबांना अन्नधान्य वाटप, महापुराच्या पाण्यासह गल्ल्यांमध्ये – घरांमध्ये घुसलेले पाणी व घराच्या पडझडीची पाहणी. तसेच विद्या मंदिर शाळेत असलेल्या विस्थापित २२५ कुटुंबांना नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने अन्नधान्याचे वाटप झाले.
यावेळी त्यांच्यासमवेत तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित शिंदे , गाव कामगार तलाठी सौ. सुप्रिया भांगे, ग्रामसेवक पी. के. पाटील आदी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गावाला भेट देऊन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी भोपळे गल्ली, इंगवले गल्ली, आंबी गल्ली, चावडी गल्ली, सावंत गल्ली, सुतार गल्ली, चावरेकर कोपरा आदी ठिकाणी पाहणी केली.
यावेळी उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील, राजू पाटील, धनाजी पाटील, प्रकाश कदम, निवृत्ती पाटील, संतोष पाटील, लक्ष्मण बंदुके, अमर पाटील, वस्ताद विलास पाटील, रमेश सावंत, सुनील कदम, अशोक पाटील, भगवान पाटील, सुनील बोगार्डे, शेखर सावंत, संजय कदम आदी प्रमुख उपस्थित होते.