कोल्हापूर • प्रतिनिधी
कोणत्याही सामाजिक कामासाठी ‘रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज’चा नेहमीच पुढाकार असतो. कोविड काळातही या क्लबने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलच्या माध्यमातून समाजसेवेचे हे व्रत अखंड सुरू ठेवण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजने हॉस्पीटलला आठ ऑक्सीजन कॉन्संट्रेटर आणि दहा ऑक्सिजन सिलेंडर प्रदान केले आहेत. या देणगीचा भविष्यात ऑक्सिजनची गरज असलेल्या अनेक गरजुंना लाभ होईल असा विश्वास डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केले.
कोल्हापुरातील ‘रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज’च्यावतीने सोमवारी ‘डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटल’ला आठ ऑक्सीजन कॉन्संट्रेटर आणि दहा मिनी ऑक्सिजन सिलेंडर समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. क्लबचे अध्यक्ष रोटेरियन सचिन मालू यांच्या हस्ते डॉ. संजय पाटील यांच्याकडे ही मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी रोटरी सनराईजचे चीफ असिस्टट गव्हर्नर सचिन झंवर, असिस्टट गव्हर्नर करूणाकर नायक, सेक्रेटरी दिव्यराज वसा, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. संजय पाटील यांनी डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटलच्यावतीने हजारो रूग्णांना मोफत आणि माफक दर्जेदार सेवा दिली जात आहे. मागील दोन वर्षांच्या कोरोना काळात हे हॉस्पीटल शंभर टक्के कोव्हीड रूग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. कोविड काळात ऑक्सिजन गरज व महत्व सर्वांच्याच लक्षात आले आहे. त्यावेळी वाढत्या रूग्णांच्या संख्येत अनेकांना ऑक्सिजन बेडची उपलब्धता होण्यात अडचणी येत होत्या. ही गरज ओळखून भविष्यातील कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी रूग्णांचे हाल होवू नयेत यासाठी हॉस्पिटलच्यावतीने पूर्ण काळजी घेतली जात आहे. ऑक्सिजनची हीच गरज ओळखून सामजिक जबाबदारीतून रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजनने पुढाकार घेवून आमच्या हॉस्पिटलला ऑक्सिजन कॉन्संट्रेटर आणि सिलेंडर प्रदान केले याबद्दल अत्यन धन्यवाद. या मदतीचा गरजू रुग्णांना मोठा फायदा होणार असून अनेकांचे प्राण वाचवणे शक्य होणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
समाजातील गरजू लोकांना लागेल शक्य ती मदत करण्याचा वसा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजने गेल्या २५ वर्षांपासून सुरू ठेवला आहे. कोविड काळात क्लबने कोविड सेंटर, अन्नदान असे अनेक उपक्रम राबवले. ऑक्सिजन अभावी कोणाचेही जीवन संकटात येऊ नये यासाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटलला ऑक्सिजन कॉन्संट्रेटर आणि सिलेंडर प्रदान केले आहेत. ही मदत फारच लहान असून अजूनही मोठे कार्य करायचे आहे. यापुढे डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या मदतीने सामजिक उपक्रमात पुढाकार घेऊ अशी अशी ग्वाही क्लबचे अध्यक्ष सचिन मालू यांनी याप्रसंगी दिली.
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे चीफ असिस्टंट गव्हर्नर सचिन झंवर यांनी रोटरी क्लबचे जगभरात व कोल्हापुरात सुरु असलेल्या सामजिक कार्याची माहिती देऊन डी. वाय. पाटील हॉस्पिटलसोबत यापुढेही अधिक कार्य करायचा मनोदय व्यक्त केला. असिस्टंट गव्हर्नर करुणाकर नायक यांनी हॉस्पिटलच्या अत्याधुनिक सिम्युलेशन लॅब व अन्य सोयी सुविधाबद्दल गौरवोद्गार काढले. त्याचबरोबर हॉस्पिटलने कोरोना काळात अतुलनीय कार्य केले असून त्या कामाला थोडासा हातभार लावण्याचा प्रयत्न आम्ही केला असल्याचे सांगितले.
यावेळी डी. वाय. पाटील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या प्र-कुलगुरु डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, वित्त अधिकारी श्रीधर स्वामी, परीक्षा नियंत्रक अरुण पोवार, परीक्षा नियंत्रक अजितसिह जाधव, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, प्राचार्य जावेद सागर, प्राचार्या सुचित्रा राठोड यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. डॉ. सुरुची पवार व डॉ. स्नेहा हर्षे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. वैशाली गायकवाड यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. मिलिंद सबनीस यांनी आभार मानले.