घोडावत पॉलिटेक्निकच्या आठ विद्यार्थ्यांची एलएनटी डिफेन्स एसएससी कंपनीत निवड

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचविलेल्या  संजय घोडावत पॉलिटेक्निकच्या  इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनीरिंगच्या ५ तर मेकॅनिकल इंजिनीरिंग विभागाच्या ३ विद्यार्थ्यांची एलएनटी डिफेन्स एसएससी कंपनीमध्ये निवड झाली आहे. 
यामध्ये ईटीसीमधून लोकेश शाह, अजिंक्य रजपूत, किशोरी ढेरे, कुमोदिनी ढोबळे, निराली वडालिया तर मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागातून अनिकेत मोरे, संदेश दाभाडे व चिन्मय कुलकर्णी यांचा समावेश आहे.
      दरवर्षी संजय घोडावत पॉलिटेक्निकच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात. एलएनटी डिफेन्स एसएससी एक प्रख्यात कंपनी असून भारतभर तसेच विविध देशात या कंपनीच्या शाखा आहेत. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात  या कंपनीने आपला नावलौकिक प्राप्त केला आहे. 
      नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एच आर मुलाखत या निकषाच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या निवडीसाठी संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. आरिफ अत्तार व फॅकल्टी कोऑर्डिनेटर्स प्रा. भगवान पाटील व प्रा.आकाश घस्ते यांचे सहकार्य लाभले.
      या यशाबद्दल विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, प्राचार्य विराट गिरी, अकॅडमीक डीन प्रा.शुभांगी महाडिक, विभागप्रमुख प्रा. रवींद्र धोंगडी व प्रा.प्रशांत पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!