कोल्हापूर • प्रतिनिधी
राधानगरी येथील कै. रेवताबाई एकावडे चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोल्हापूरी फेटा, शाल, बुके व मास्क वाटप करून महिलांचा गौरव करण्यात आला.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. महिलांना वर्षातून एक दिवस तरी स्वतःसाठी जगण्याचा सल्ला देत, नाती सांभाळताना महिलांनी स्वतःचे आरोग्य, स्वतःचे छंद आणि स्वतःला जपायला शिका असा सल्ला दिला.
यावेळी राधानगरीच्या तहसिलदार मिना निंबाळकर, पोलीस निरीक्षक अनुराधा पाटील, दिवाणी न्यायालय वरीष्ठ लिपीक विजया फराकटे, तहसिल कार्यालय वरिष्ठ लिपीक सारीका मिरजकर, रेखा मोळे, सुचित्रा गुरव, म. पो. अंमलदार दिपाली भांदिगरे यांच्यासह पार्वती डोंगरे, सारीका लोखंडे, कोतवाल, सुनीता डवरी, कोमल पाटील, प्रियांका पाटील, निलम खामकर यांचा ट्रस्टचे संस्थापक प्रल्हाद एकावडे यांचे हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी तहसीलदार मीना निंबाळकर, पुनम मर्दाने, विजया फराकटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी एकावडे ट्रस्टचे प्रल्हाद एकावडे, नामदेव कुसाळे, प्रणित एकावडे उपस्थित होते. प्रास्ताविकात रामचंद्र चौगले यांनी ट्रस्टच्या कार्याचा आढावा घेतला. सारीका मिरजकर यांनी आभार मानले