भारतीय तलवारबाजी महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड

नाम.सतेज पाटील यांचा गोकुळतर्फे सत्‍कार


कोल्‍हापूर • प्रतिनिधी
     गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये भारतीय तलवारबाजी महासंघाच्‍या उपाध्‍यक्षपदी निवड झाल्‍याबद्दल गोकुळ परिवारातर्फे जिल्‍ह्याचे पालकमंत्री नाम. सतेज पाटील यांचा सत्‍कार राज्‍याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्‍या हस्‍ते व आमदार राजेश पाटील तसेच गोकुळचे चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या उपस्थित करण्‍यात आला.
     यावेळी बोलताना या खेळातील खेळाडूंना राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करण्‍यासाठी नक्‍कीच प्रोत्साहन देऊ. भविष्‍यात या खेळातील जास्‍ती जास्‍त आंतरराष्‍ट्रीय खेळाडू जिल्‍ह्यात तयार करण्‍यासाठी प्रयत्‍नशील राहू.
      याप्रसंगी जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश  पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे, संचालिका अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणेकर व संघाचे अधिकारी उपस्थित होते.
——————————————————- Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *