कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची मार्चमध्ये निवडणूक: अध्यक्ष कुलदीप गायकवाड

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची निवडणूक मार्च-एप्रिल २०२२मध्ये होणार असल्याची माहिती सराफ संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
     ते म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी पदभार स्वीकारलेल्या आम्हां पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२२ मध्ये संपत आहे. फेब्रुवारी महिन्यात संघाची जनरल बॉडी होईल. यावेळी आम्ही पायउतार होऊन निवडणूक मंडळाकडे कार्यभार सोपवू. निवडणूक मंडळाची बैठक होऊन त्यामध्ये मार्च-एप्रिलमध्ये कोणत्या तारखांना निवडणूक घ्यावयाची याची माहिती दिली जाईल. एप्रिलमध्ये पूर्ण क्षमतेने नविन कार्यकारिणी येईल.
     पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष जितेंद्र राठोड, सचिव अनिल पोतदार (हुपरीकर), संचालक प्रसाद कालेकर, तेजस धडाम व सुहास जाधव उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!