वीज बिल स्वीकृती केंद्राचे उद्घाटन


 कोल्हापूर • प्रतिनिधी
      महावितरणकडून वीज ग्राहकांच्या सोईसाठी ताराबाई पार्क येथील विद्युत भवनात वीज बिल स्वीकृती केंद्र सुरू करण्यात आले आहे. कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे व मुख्य अभियंता (राज्य कृषी धोरण) श्रीमती पुष्पा चव्हाण यांचे हस्ते केंद्राचे उद्घाटन झाले.
      उद्घाटनानंतर कसबा बावड्यातील शंकरराव परब या ग्राहकाने ६५००/- रूपये वीज बिल भरले. त्यांना श्रीमती पुष्पा चव्हाण यांचे हस्ते पावती प्रदान करण्यात आली. सदर वीज बिल स्वीकृती केंद्राचे कामकाज महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिीसिटी वर्कर्स फेडरेशनच्या अधिपत्याखालील वीज मंडळ सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या. कोल्हापूर यांच्यामार्फत हाताळले जाणार आहे.
     याप्रसंगी कार्यकारी अभियंता (प्रशासन) नरेंद्र ताडे, कार्यकारी अभियंता डॉ. नामदेव गांधले, प्रभारी सहाय्यक महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्रीमती स्नेहा सोळांकूरकर, पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद शिंदे, मुख्य व्यवस्थापक आनंदा कुंभार आदी उपस्थित होते.
    सुट्टीदिवशीही केंद्रे सुरू राहणार …..
   कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महावितरणची अधिकृत वीज बिल भरणा केंद्रे दि.२७ ते २९ मार्च या सुट्टीच्या कालावधीतही सुरू राहणार आहेत. तेंव्हा वीजग्राहकांनी चालू व थकीत वीज बिले भरण्यासाठी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी केले आहे.
———————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *