साहसी पर्यटन उपक्रमांसाठीचे प्रथमोपचार शिबीर उत्साहात

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     महा ॲडव्हेंचर कौन्सिल आणि कोल्हापूर जिल्हा माऊंटेअरींग ॲण्ड अलाईड स्पोर्ट असोसिएशन यांच्यावतीने प्रथमोपचार शिबीर – कोर्सचे आयोजन करण्यात आले होते. जेऊर येथील व्हर्टिकल ॲडव्हेंचर पार्क येथे दोन दिवस हे शिबीर झाले.
     जेष्ठ गिर्यारोहक मिलींद चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबीरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील साहसी पर्यटन व साहसी खेळाशी संबंधित २५ सदस्यांचा सहभाग होता. शाहूवाडी, आजरा, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, कागल, गगनबावडा, हातकणंगले इत्यादी तालुक्यातील सदस्य सहभागी झाले होते.
     पर्यटन मंत्रालयाच्या साहसी पर्यटन उपक्रम धोरणानुसार असलेला हा प्रथमोपचार अभ्यासक्रम सुरक्षिततेच्या दृष्टीने भविष्यात अत्यंत उपयुक्त ठरेल. प्रथमोपचार, कृत्रिम श्वसन, दंश उपचार, जखमांवरील उपचार आणि रेस्क्यू तंत्र याबद्दल शिबीरात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
     या शिबीरामध्ये पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका सौ. सुप्रिया करमरकर यांनी साहसी खेळाच्या जीआरबाबत मार्गदर्शन केले. महा ॲडव्हेंचर कौन्सिलचे वसंत लिमये, शिरीष सहस्रबुद्धे, कोल्हापूर जिल्हा माऊंटेअरींग असोसिएशनचे विनोद कांबोज, प्रमोद पाटील, ऋषीकेश केसकर आदी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!