कोल्हापूर • प्रतिनिधी
जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कोल्हापूर आयोजित, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, संजय घोडावत पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वसाधारण, विशेष घटक योजनाअंतर्गत सर्वसाधारण आणि अनुसूचित जातीच्या युवक युवतींसाठी मोफत आणि दोन हजार रुपये विद्यावेतनासह दोन महिने कालावधीचा तांत्रिक आणि उद्योजकता कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून १४० सुशिक्षित बेरोजगार युवक युवतीने नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्यांची कलचाचणी घेऊन सीएनसी अँड व्ही एमसी ऑपरेटर ३० प्रशिक्षणार्थींना प्रवेश देण्यात आला. तसेच सीएनसी अँड व्हीएमसी ऑपरेटर फक्त एस सी संवर्गातील २८ प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली. फौंड्री टेक्नॉलॉजी एस सी संवर्गातील २७ प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली. एकूण ८५ प्रशिक्षणार्थींची निवड एसजीपी, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर समितीने केली.
प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये तांत्रिक प्रशिक्षण थेअरी आणि प्रॅक्टिकल अभ्यासक्रमासोबत उद्योजकता उभारणी, व्यक्तिमत्व विकास, उपयुक्त शासकीय योजना, मुद्रा योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, कौशल्य विकास योजना, मार्केट सर्वे, जीवन कौशल्य, मुलाखत कौशल्य, आरोग्य देखभाल आणि निसर्गाचे संवर्धन, संवाद कौशल्य इत्यादीचे मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रमात करण्यात आले.
मल्हार एंटरप्राइजेस आणि दत्त इंटरप्राईजेस या लेबर कंपनी अंतर्गत कॅम्पस इंटरव्ह्यू घेऊन १९ प्रशिक्षणार्थींची शासनाच्या नियमनुसार किमान मानधनावर नोकरीसाठी निवड झाली आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी प्रवीण कायंदे, संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, संजय घोडावत पॉलिटेक्निकचे प्राचार्य विराट गिरी, एसजीयु यांत्रिक अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. संजय इंगळे, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग प्रमुख समन्वयक प्रा. अजय बी. कोंगे, सीएनसी लॅब इन्चार्ज व्ही. एल. फासके, प्रसाद लाड, आर. बी. कुंभार, ए. बी. नाईक, मकरंद जोशी, डॉ. संदीप वाटेगावकर यांचे सहकार्य आणि अनमोल मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना लाभले आहे.
हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रा.अजय कोंगे यांनी अथक परिश्रम घेतले याबद्दल अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले व प्राचार्य विराट गिरी यांनी अभिनंदन केले