ई.पी.एस-९५ राष्ट्रीय संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांची ‘गोकुळ’ला भेट


कोल्हापूर • प्रतिनिधी
      ई.पी.एस-९५राष्ट्रीय संघर्ष समितीचे पदाधिकारी हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा. संघ मर्या., कोल्‍हापूर (गोकुळ) ला भेट दिली.
      सेवा निवृत्त कमांडर अशोक राऊत यांनी ई.पी.एस-९५ राष्ट्रीय संघर्ष समिती देशातील २७ राज्यांमध्ये ६७ लक्ष पेन्शनराच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कार्यरत आहे. सदर पेन्शनरांनी त्याना दरमहा रुपये शंभर ते २००० इतक्या अल्प प्रमाणात मिळणाऱ्या पेन्शनमध्ये त्यांनी जगायचे कसे हा खरा महत्वाचा प्रश्न आहे, पेन्शनराबरोबरच कार्यरत कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या नुकसान यावर सविस्तर चर्चा झाली व त्यासाठी त्यांनी १९ डिसेंबर २०२१ रोजी लखनऊ येथे आयोजित केलेल्या मेळाव्यास ई.पी.एस-९५ अंतर्गत पेन्शनरा समिती बरोबरच कार्यरत कर्मचाऱ्यांनीसुद्धा मोठ्या संख्येने हजर राहण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.
      यावेळी बोलताना संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे म्‍हणाले की, गोकुळ दूध संघ हा संघर्ष समितीच्‍या पाठीशी आहे. त्यांना उर्जा देण्याचे काम गोकुळ दूध संघ नक्कीच करेल व संघर्ष समितीचे काम कौतुकास्पद आहे. गोकुळने नेहमी कर्मचाऱ्यांचे हित जोपासले आहे. तसेच संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांनी या संघर्ष समितीला पाठिंबा व शुभेच्छा दिल्या.
      यावेळी गोकुळचे जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, राष्ट्रीय संघर्ष समितीचे पदाधिकारी सुभाष पोखरकर, श्रीमती शोभाताई आरस, सौ. सरिताताई नारखेडे, समिदर, नारखेडे, वाळके, इंगळे, उंबरहांडे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बी. एस. किल्लेदार यांच्यासह इतर संस्थांचे पदाधिकारी एस. डी. मगदूम, सुहास यादव, ऐनापुरे, जोग, एच. एन. पाटील इत्यादी पेन्शनर हजर होते. बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, आस्थापना व्यवस्थापक डी. के. पाटील, संघाचे माजी कर्मचारी पी. एस. महाडिक, सुनील कदम, कर्मचारी संघटनेचे निकम, मल्हार पाटील व संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *