ई.एस.आय.सी. दवाखान्यास मंजूरी

Spread the love

कोरोना काळात शासनाचा अनेक कामगारांना दिलासा..

गेल्या अनेक वर्षापासून उद्योजक व कामगारांच्या मागण्या होत्या की, पूर्ण क्षमतेने ईएसआयसी हाॅस्पीटल सुरू व्हावे. दरमहिन्याला मालक आणि कामगारांच्याकडून वर्गणी न चुकता वसुल होत आहे परंतु दवाखाने नसल्यामुळे कामगारांना व त्यांच्या कुटंुबीयांना ईएसआयसीच्या सुविधा मिळत नव्हत्या. परंतु आता कोल्हापूर जिल्हयात महाराष्ट् शासनाच्या महाराष्ट् राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत विविध ठिकाणी सेवा दवाखाने शिरोली-कोल्हापूर, जयसिंगपूर-हातकणंगले, कागल-कोल्हापूर, चंदगड/शिनोली/हलकर्णी/गडहिंग्लज भाग येथे दवाखाने सुरू करण्यास शासनाने मंजूरी दिल्यामुळे कोरोना काळात कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेले वर्षभर सातत्याने प्रयत्न करत असल्यामुळे ई एस आय सी च्या माध्यमातून वैद्यकीय सेवा आपल्या दारी या संकल्पनेतून आपल्यासाठी चार सेवा दवाखाने मंजूर करण्यात आपण यशस्वी झालेल्या आहेत .औद्योगिक ठिकाणांच्या जवळ सुसज्ज अशी ही सेवा दवाखाने पूर्ण क्षमतेने आपल्या कामगार बांधवांना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यविषयक सर्व सेवा पुरवणार आहेत.
कोल्हापूर जिल्हा हा देशातील एकमेव असा हा जिल्हा आहे की जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर सेवा दवाखाने उपलब्ध होतील. ईएसआयसी संबंधीत अनेक समस्या आता सुटू लागल्या आहेत. कामगारांना वैद्यकिय सुविधा मिळणे, औषधे मिळणे, वैद्यकिय बिलांची तसेच सलग्न दवाखान्यांची बिले वेळेत देणे, हाॅस्पीटल मधील इमारतींचे नुतनीकरण, डिस्पेंसरी सुरू करणे, ब्रॅंच आॅफिस सुरू करणे इत्यादी समस्या सुटण्यास मदत होत असून त्यासाठीचा निधीही उपलब्ध होत असून यासाठी मा.खासदार श्री.संजय मंडलीकसोा हे सातत्याने प्रयत्न करित आहेत. कोल्हापुरातील उद्योजकांना व कामगार बंधूंना उत्कृष्ट सुविधा मिळाव्यात व सर्व प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या खासदार श्री संजय मंडलिक यांचे आभार

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!