• राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचा निर्णय
कोल्हापूर • प्रतिनिधी
राजारामपुरीतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने गेले दोन महिने बंद असल्यामुळे व्यापार्यांचे बरेच नुकसान होत आहे. प्रशासनाला अनेक विनंत्या करून सुद्धा सदर दुकाने चालू करण्यास परवानगी मिळत नाही. त्या अनुषंगाने कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज कार्यालयात सर्व संघटनाचे मिटिंगमध्ये ठरलेनुसार राजारामपुरी व्यापारी असोसिएशन च्यावतीने उद्या, बुधवारी (दि.९) जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवासहित सर्व दुकाने व व्यवहार दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन अध्यक्ष ललित गांधी यांनी केले.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या निर्णयास राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या ऑफीसमध्ये झालेल्या मिंटीगमध्ये चेंबरच्या निर्णयास पाठींबा देण्यात आला.
यावेळी अध्यक्ष ललित गांधी, सचिव रणजीत पारेख, संचालक रमेश कारवेकर, दिपक पुरोहीत, विजय येवले उपस्थित होते.