पश्चिम महाराष्ट्रात इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीज असोसिएशनची स्थापना

Spread the love
Suresh AmbuskarAttachmentsThu, Oct 14, 9:37 PM (14 hours ago)
to me

• शिवप्रसाद पाटील प्रेसिडेंट तर व्हाईस प्रेसिडेंट कुलदीप शिंगटे
कोल्हापूर • प्रतिनिधी
     पश्चिम महाराष्ट्रातील इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीज असोसिएशन (EMAA) या असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून संस्थेला नुकतेच नोंदणी प्रमाणपत्रही मिळाले आहे.
     पश्चिम महाराष्ट्रातील आघाडीच्या व प्रमुख इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीची बैठक नोव्हेंबर २०२० मध्ये झाली होती. या बैठकीत इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीजसमोर असलेल्या अनेक विषयांची विस्तृत चर्चा झाली. या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिध्दुदुर्ग विभागातून ४० हून अधिक इव्हेंट एजन्सीज उपस्थित होत्या. या बैठकीतील निर्णयाप्रमाणे आता इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीज असोसिएशन या संघटनेची रीतसर स्थापना झाल्याची घोषणा एम्माचे प्रेसिडेंट व ब्लू बॉक्स इव्हेंट डिझाइन्स आणि कन्स्ट्रक्शन्सचे शिवप्रसाद पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली. कोरोना संदर्भातील निर्बंध शिथिल झाल्यानंतर शानदार कार्यक्रमाद्वारे मान्यवरांच्या उपस्थितीत एम्पाचे भव्य सोहळ्यात अधीकृत लॉन्चिंग होणार आहे.
     EMAAचे पहिले संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये प्रेसिडेंट शिवप्रसाद पाटील (ब्लू बॉक्स इव्हेंट डिझाइन्स आणि कन्स्ट्रक्शन्स), व्हाईस प्रेसिडेंट कुलदीप शिंगटे (इलेवंथ अवर), सेक्रेटरी नितीन पाटील (सेलेब्रेशन इव्हेंट्स), ट्रेझरर संग्राम घराळ (लाईफ टाईम सर्विसेस) डायरेक्टर म्हणून राजेश शाह (रिसोर्सेस इव्हेंटस), सुजित चव्हाण (क्रिएटीव्ह एक्झिबिशन अँड इव्हेंट), अमरदीप पाटील (ॲडफाईन), पारिजात दळवी (ओम सुंदर इव्हेंट्स), सूरज पाडळे (क्रिएटिव्ह गॉड्स), स्वप्नील हिडदुगी (एनर्जी इव्हेंटस् ) व सुशांत टक्कलकी (जी. टी. ॲड्स) यांचा समावेश आहे.
      इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसायातील सुलभता व इव्हेंट इंडस्ट्रीतील विविध घटकामध्ये व्यवहाराच्या व करारांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्वे, एसओपी व स्टॅंडर्ड इंडस्ट्री प्रॅक्टिसेस ठरवून त्या अमलात आणण्यावर एम्पाचा भर असेल. सभासदांच्या हितासाठी व इव्हेंट इंडस्ट्रीच्या विस्तारासाठी अनेक कार्यक्रम एम्पातर्फे आयोजित केले जातील, असा निर्धार शिवप्रसाद पाटील यांनी व्यक्त केला.  एम्पाचे उद्दीष्ट, संघटनात्मक रचना, सभासद वर्गवारी, प्रशासन व व्यवस्थापन, सामान्य नियम व कार्यपध्दती व इतर माहितीसाठी www.emaa.life या संकेतस्थळावर भेट द्या असे आवाहन एम्पाच्या संचालकांनी केला आहे.
      EMAAचे सभासद होण्यासाठी शिवप्रसाद पाटील (९८२३०९६८१८), सुजित चव्हाण (९९२१६६२२६६), राजेश शाह – सांगली (९८२३०१३७७०) व पारिजात दळवी – सातारा (९९२३१९९९९५) यांच्याशी संपर्क साधावा. किंवा Member@emaa.life येथे ई – मेल करावा, असे आवाहन EMAA चे मेंबरशिप कमिटी प्रमुख राजेश शाह व सुजित चव्हाण यांनी केले आहे.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!