युरो कप : इटली – इंग्लंड फायनल

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     इंग्लंडने डेन्मार्कला २ विरूद्ध १ गोलने नमवून युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. आता इटली विरूद्ध इंग्लंड अशी विजेतेपदासाठी लढत होईल.
   युरो कप स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इटलीने स्पेनचे आव्हान संपुष्टात आणले व अंतिम फेरीत धडक दिली. आज झालेल्या दुसऱ्या लढतीत इंग्लंडने डेन्मार्कवर मात करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होण्याचा नवा इतिहास रचला.
    इंग्लंड – डेन्मार्क सामन्यात पूर्वार्धात डेन्मार्कच्या मिकेल डैंसगार्डने गोल केला. त्यानंतर डेन्मार्ककडूनच स्वयंगोल झाला आणि सामना १-१ गोल बरोबरीत आला. पूर्णवेळ बरोबरीत राहिलेल्या सामन्यात एक्स्ट्रा टाईमध्ये मिळालेल्या पेनल्टीचा लाभ इंग्लंडला झाला. कर्णधार हैरी केनने मारलेल्या फटक्यावर गोल होऊन इंग्लंडला २-१ ची आघाडी मिळाली. अखेर याच गोलफरकावर इंग्लंडने विजयावर शिक्कामोर्तब करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!