घोडावत पॉलीटेक्निकचा ९वा वर्धापन दिन उत्साहात


कोल्हापूर • प्रतिनिधी
      आज तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहेत. विद्यार्थ्यांना डिग्री घेऊन बाहेर पडल्यानंतर इंडस्ट्रीमधील नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी वेळेचे नियोजन व आयुष्यात स्वयं मूल्यांकन करायला हवे असे प्रतिपादन मध्यप्रदेश सरकारच्या क्रिस्प सोसायटीचे चेअरमन डॉ.श्रीकांत पाटील यांनी केले. संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या ९व्या वर्धापनदिनी ते बोलत होते.
     संजय घोडावत पॉलीटेक्निकचा ९ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन विश्वस्त विनायक भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य विराट गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वस्त विनायक भोसले हे होते.
     पॉलीटेक्निकचे प्राचार्य विराट गिरी यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले ” पॉलीटेक्निकने लागोपाठ दोन वेळा सर्व शाखांना एनबीए मानांकन मिळविले आहे. ही खूप अभिमानास्पद बाब आहे. या यशामध्ये चेअरमन, विश्वस्त, स्टाफ, विद्यार्थी व पालक यांचा महत्वाचा वाटा आहे. कोरोना काळात शिक्षकांनी खूप कष्ट घेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन मोडद्वारे शिक्षण पुरविले. कोरोना आणखी किती दिवस आहे हे माहित नाही परंतु आमचे शिक्षक व विद्यार्थ्यांच्यात या संकटाला सामोरे जाण्याचे मनोबल निर्माण झाले आहे.”
     संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले ” विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून वाटचाल करायला पाहिजे, आई वडिलांचा आदर करायला हवा तसेच सकारात्मक विचार जोपासायला हवेत. कोरोनामध्ये आपण काय गमावले याचा विचार न करता काय कमावले याचा विचार करून यापुढील आयुष्यात ध्येय निश्चिती करून ती पूर्ण होण्याचे दृष्टीने सकारात्मक प्रयत्न करावेत. प्रत्येक बाबतीत आपला विचार इतरांपेक्षा कसा वेगळा असेल व त्या विचाराला आपण कसे यशस्वी करू शकतो हाच प्रामाणिक प्रयत्न असला पाहिजे.
     या कार्यक्रमात कोरोनाकाळात आपले कर्तव्य बजावून शासन आदेशानुसार सर्व हॉस्पिटलचे ऑडिट करणाऱ्या प्राध्यापकांना तसेच संस्थेसाठी अविरत कष्ट घेऊन उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या स्टाफला गौरवपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. याचबरोबर वर्धापन दिनानिमित्त ऑनलाईन आयोजित केलेल्या पोस्टर प्रेझेंटेशन, निबंध स्पर्धा, एक्सटेम्पोर स्पीच स्पर्धेतील विजेत्यांचा तसेच कोल्हापूर टॅलेंट हंट परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.  
      कार्यक्रमास अकॅडमिक डीन  प्रा. एन. एस. पाटील, सर्व विभागप्रमुख, विद्यार्थी व सर्व स्टाफ ऑनलाईन उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.नितीन जाधव, प्रा.सागर चव्हाण व टीमने अथक परिश्रम घेतले. 
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.आर पाटील व प्रा.एस.बी. वाटेगावकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.नितीन जाधव यांनी केले.
=========================== Attachments areaReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *