नो मर्सी ग्रुपचा १४वा वर्धापनदिन उत्साहात

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून ४ डिसेंबर २००७ रोजी स्थापन केलेल्या नो मर्सी ग्रुपचा १४ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी युवा नेते आणि या ग्रुपची कमान सांभाळत असलेले पुष्कराज क्षीरसागर, नो मर्सी ग्रुपचे अध्यक्ष रोहन घोरपडे आदी उपस्थित होते. यावेळी शुभम घोरपडे यांची नो मर्सी ग्रुपच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
      युवकांचे संघटन करून युवा पिढीला व्यसनापासून दूर ठेवून सामाजिक आणि विधायक कार्यासाठी नो मर्सी ग्रुप नेहमी अग्रेसर असतो. ऋतुराज क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून स्थापन केलेल्या नो मर्सी ग्रुपच्या माध्यमातून कोल्हापूर शहरामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण, हिवाळ्यामध्ये गरीब व गरजू व्यक्तींना चादरीचे वाटप, जनावरांना चारा वाटप, शहरातील गरीब व गरजू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप अशा विविध सामाजिक कार्यात नेहमी हिरीरीने या ग्रुपमधील सदस्य  कार्यरत असतात.
      संस्थापक ऋतुराज क्षीररसागर व या ग्रुपची सध्या कमान सांभाळणारे पुष्कराज क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त या ग्रुपकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
      ग्रुपच्या १४ व्या वर्धापनदिनी शुभम घोरपडे यांची नो मर्सी ग्रुप उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पुष्कराज क्षीरसागर यांनी नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नो मर्सी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. वर्धापनदिनी ओमिक्रोन या नवीन कोविड१९ विषाणूचा संसर्ग कोल्हापूरवर ओढवू नये, यासाठी सर्व नागरिकांनी मास्क वापरावेत, सामाजिक सुरक्षित अंतर राखावे आणि लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावे,असे आवाहन  केले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!