प्रसिद्ध गायक जावेद अली यांच्या हस्ते फ्लेमस् रेस्टॉरंटचा शुभारंभ

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापुरातील खवय्यांना देश – विदेशातील पदार्थांचा आस्वाद देण्यासाठी, टाकाळा रोडवर फ्लेम्स हे नवे रेस्टॉरंट सुरू झाले आहे. यापूर्वी अनेक पंचतारांकीत हॉटेल आणि आंतरराष्ट्रीय क्रुझवर शेफ म्हणून काम करणार्‍या रथीन यांनी, या रेस्टॉरंटद्वारे कोल्हापूरच्या खवय्यांना नवनवीन डिशेस उपलब्ध केल्या आहेत. प्रसिद्ध गायक जावेद अली यांच्या हस्ते नुकतेच या रेस्टॉरंटचे उद्घाटन झाले. 
       कोल्हापुरातील खवय्यांना देश – विदेशातील चविष्ट खाद्यपदार्थांच्या डिशेस मिळाव्यात, यासाठी कोल्हापुरातील दोन मित्रांनी एकत्र येऊन, फ्लेमस रेस्टॉरंट सुरू केले आहे. टाकाळा मेन रोड येथील भाग्यश्री अपार्टमेंटमध्ये सुरू केलेल्या रेस्टॉरंटचे उद्घाटन बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक, पुष्पा फेम जावेद अली यांच्या हस्ते करण्यात आले.
      मुळचे कोल्हापूरचे शेफ असलेल्या रथीन यांनी यापूर्वी देश-विदेशातील प्रसिद्ध पंचतारांकीत हॉटेलमध्ये काम केले आहे. त्यांच्या हातचे पदार्थ गायक जावेद अली यांनी चाखले आहेत. त्यामुळे त्यांच्या नव्या रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यासाठी कोल्हापुरात येण्याचा शब्द, जावेद अली यांनी रथीन यांना दिला होता. त्यानुसार जावेद अली यांनी फ्लेमस् बाय शेफ रथीन या नव्या रेस्टॉरंटचे उद्घाटन करून, दिलेला शब्द पाळला. 
     फ्लेमस् रेस्टॉरंटमध्ये इटालियन, थाई, मेक्सिकन, ओरिएन्टल, चायनीज अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण आणि चविष्ट डिशेस उपलब्ध आहेत. तसंच स्टोक्स, सलाडस्, थाई करी पेपर राईस, बर्मिज खाऊसे, करीज आणि सीझलर्स मिळणार आहेत. विशेष म्हणजे येथे शेफनी तयार केलेला फ्रेश पिझ्झा बेस वापरून, अस्सल इटालियन थिन क्रश पिझ्झाही मिळेल. सोबत पास्ता, बर्गर्स, सँडविच, मॉकटेल, कॉफी यांचेही काऊंटर्स रेस्टॉरंटमध्ये आहेत. कोल्हापूरकरांनी फ्लेमस् रेस्टारंटला भेट देऊन डिशेसचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन शेफ रथीन आणि राहुल जोशी यांनी केले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!