निर्णय होईपर्यंत उपोषण सुरूच: खासदार संभाजीराजे छत्रपती

Spread the love


  मुंबई :
       आझाद मैदानावरील हे आंदोलन गोरगरीब मराठा समाजासाठी आहे, त्यांच्या हक्कासाठीच आम्ही लढतोय, आम्ही कुठलाही पक्ष घेऊन आलो नाही. आंदोलनात सहभागी झालेले सर्व स्व-इच्छेने आलेले आहेत. आम्ही कुणाचीही सुपारी घेऊन आलेलो नाही. त्यामुळे सरकारने चर्चेची दारे खुली केली असली तरी जोपर्यंत राज्यशासनाकडून सर्व मागण्या मान्य झाल्याचा लेखी निर्णय दिला जात नाही तोपर्यंत माझ उपोषण सुरुच राहणार असल्याचा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.
       मराठा आरक्षणासह समाजाच्या इतर मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या भेटीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील गेले होते. या भेटीवेळी संभाजीराजेंनी म्हटले आहे की, दिलीप वळसे पाटील आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. वर्षावरील बैठकीत काही मुद्दे घेण्यात आले. त्याचंही आम्ही स्वागत करतो. पण आमचे हे ६ मुद्दे देखील निकाली लागल पाहिजेत.
       यावेळी खासदार संभाजीराजे म्हणाले की, मागे मुख्यमंत्र्यांनी १५ दिवसात प्रश्नमार्गी लावू असे म्हटले होते, त्या आजतागायत मागण्या मान्य झालेल्या नाहीत. त्यांच्या खात्याशी संबधित विषयांवर ते स्वत: लक्ष घालणार आहेत. चर्चेला आता सुरूवात झाली आहे. जे काही निर्णय होणार ते लेखी स्वरुपात व्हावेत. पण मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी जागा सोडणार नाही, हे आंदोलन गोरगरीब मराठा समाजासाठी आहे, त्यांच्या हक्कासाठीच आम्ही लढतोय, आम्ही कुठलाही पक्ष घेऊन आलो नाही. आंदोलनात सहभागी झालेले सर्व स्व-इच्छेने आलेले आहेत. आम्ही कुणाचीही सुपारी घेऊन आलेलो नाही. त्यामुळे सरकारने वेळ देऊन चर्चेतून तत्काळ मार्ग काढण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
       मराठा समाजाच्या मागण्याशी संबंधित असणाऱ्या सर्व खात्याचे सचिवांची तत्काळ बैठक घेवून निर्णय घेतला पाहीजे. उपोषण करण्यापूर्वी माझी राज्यशासनाशी चर्चा झाली होती. त्यांची इच्छा होती ती मी हे आमरण उपोषण करू नये. आत्ता माझी तब्येत बरोबर नाहीये म्हणून मला उपोषण थांबवायला सांगतायत , पण मी त्यांना स्पष्टपणे सांगितले वेळप्रसंगी मी अजून काही दिवस असाच त्रास सहन करत राहील परंतु प्रलंबीत मागण्यांची पुर्तता केल्याशिवाय मार्ग हटणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!