कोल्हापूर • प्रतिनिधी
एफसी कोल्हापूर सिटीची फुटबॉल आयलीग या स्पर्धेकरिता महिलांची संघ निवड चाचणी प्रक्रिया कोल्हापुरात होत आहे. बुधवार दि.१७ मार्च रोजी दुपारी चार वाजता विभागीय क्रीडा संकुल, पद्माळा संभाजीनगर, कोल्हापूर येथे होईल, तरी इच्छूक महिला खेळाडूंनी निवड चाचणीस उपस्थित रहावे, असे आवाहन संघ व्यवस्थापनातर्फे केले आहे.
फुटबॉलमध्ये राज्य आणि राष्ट्रीय इंडियन वुमन्स लीग लुधियाना व बेंगलोर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये एफसी कोल्हापूर सिटी संघाने नांवलौकीक मिळवला आहे. आयलीग या स्पर्धेकरिता महिला संघाची निवड प्रक्रिया १७ मार्च रोजी होणार आहेत. तरी इच्छुकांनी विभागीय क्रीडा संकुल येथे निवड चाचणीला उपस्थित रहावे.
अधिक माहितीसाठी ९९२१५८२०२०, ९५२७७७२१२१ व ८३९०९९१११० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एफसी कोल्हापूर सिटीच्यावतीने करण्यात आले आहे.