महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर सदोष मनुष्य वधाचा दावा दाखल करा: भाजपाची मागणी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एम.पी.एस.सी) परीक्षा उतीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. या आत्महत्येला सर्वस्वी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार विरोधात भारतीय जनता पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करून महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणा बाजी केली.
     यानंतर भाजपा शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन सादर केले. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबियांना ५० लाख इतकी नुकसान भरपाई द्यावी तसेच MPSC आयोगाची कार्यपद्धती बदलावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
      भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, सरचिटणीस विजय जाधव,
संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांनी मनोगत व्यक्त केले.
      यावेळी दिलीप मेत्रानी, हेमंत आराध्ये, चंद्रकांत घाटगे, सचिन तोडकर, दिग्विजय कालेकर, युवा मोर्चा ज़िल्हा अध्यक्ष विजय खाडे, विवेक कुलकर्णी, आशिष कपडेकर, भरत काळे, दिनेश पसारे, तानाजी निकम, दिलीप बोंद्रे, संदीप कुंभार, महेश यादव, सुनील पाटील, राजाराम परीट, प्रीतम यादव, सचिन साळोखे, सचिन सुतार, अनिल पाटील, हर्षद कुंभोजकर, अमर साठे, प्रदीप उलपे, विशाल शिराळकर, दत्ता लोखंडे, अभिजीत शिंदे, महेश जाधव, बापू राणे, आज़म जमादार, सुशांत पाटील, गिरीश साळुंखे, रवींद्र मुतगी, प्रवीणचंद्र शिंदे, साजन माने, देवरथ लोंढ़े, ओमकार घाटगे, हर्षशांक हळीकर, अमित टिकले, विवेक राजवर्धन, प्रदीप घाटगे, रोहित कारंडे, सुनील पाटील, विवेक वोरा, सीमा बारामते, मंगल निपानीकर, विद्या बनछोडे, विद्या बागडी, सुधीर हराळे, कृष्णात आतवाडकर आदी उपस्थित होते.
——————————————————- Attachments area

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!