…अखेर आखरी रस्त्याच्या कामास सुरुवात

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      शहरातील प्रमुख वर्दळीचा असलेला आखरी रस्त्याचे काम गेली अनेक वर्षे रखडले होते. या कामाची लवकरात लवकर पूर्तता व्हावी याबाबत भागातील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. अखेर आज आखरी रस्त्याच्या कामाची प्रतीक्षा संपली. रस्त्याच्या कामास सुरुवात झाली. आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आखरी रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.
     गेले ५ ते ७ वर्षापासून या आखरी रस्त्याचे काम रखडले गेले होते. प्र.क्र.२९, ३० व ५० अंतर्गत पंचगंगा हॉस्पिटल (मारुती मंदिर) ते जामदार क्लब पंचगंगा रोड पेव्हर पद्धतीने रस्ता डांबरी करणे, या कामास रु.२३ लाख ८८ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी वर्षानुवर्षे रखडलेल्या या रस्त्याच्या कामास सुरवात केल्याबद्दल या भागातील नागरिकांच्यावतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर भागातील नागरिकांनी माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांच्यासह आखरी रस्ता कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांचे जाहीर आभार मानले. 
     यावेळी माजी महापौर सौ.सरिता मोरे, माजी महापौर माधवी गवंडी, ऋतुराज क्षीरसागर, नंदकुमार मोरे, किशोर घाटगे, प्रकाश गवंडी, किरण शिराळे, रियाज बागवान, निलेश हंकारे, उदय जगताप, विठ्ठल ओतारी, मोहन ओतारी, दीपक लिंगम, राकेश पोवार, जयराज ओतारी, जहांगीर अत्तार, किरण मांगुरे, प्रदीप कोंडेकर, उदय जाधव, नितीन साळी, सुशांत पोवार, बबलू साठम, सुनील घाग, संग्राम मोरे, शेखर रणसिंगे, महेश कामत, साबीर उस्ताद, भिकशेठ कदम, विक्रम ठमके, जयराज ओतारी, राहुल ओतारी, शीतल पवार, उषा काटकर, सुनिता भोसले, पुष्पा काटकर, संगीता लिंगम, करुणा ओतारी, संगीता माने, स्नेहाली ओतारी आदी प्रभागातील महिला व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!