कोल्हापूर • प्रतिनिधी
पाचगाव (ता.करवीर) येथील दिवंगत पत्रकार दीपक चव्हाण यांच्या कुटूंबियांना ‘संवाद’ व्हाट्सअप ग्रुपच्यावतीने आर्थिक मदत करण्यात आली. रोख ४१ हजार रूपयांची आर्थिक मदत गुरुवारी (दि.१९) ‘संवाद’ व्हाट्सअप ग्रुपच्यावतीने सुपूर्द करून कुटुंबियांना धीर दिला.
यावेळी दीपक कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. बिकटस्थितीत असलेल्या चव्हाण कुटुंबियांना सर्वांच्या सहकार्याने थोडाफार हारभार ग्रूपच्या माध्यमातून लावू शकलो याचे समाधान वाटत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी उद्योजक प्रताप पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष हंबीरराव पाटील, भोगावती कारखान्याचे माजी संचालक बी.ए.पाटील, माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, इंजि. राजेंद्र मांगलेकर, बालिंगा सरपंच मयूर जांभळे, ग्रामसेवक शिवाजी वाडकर, पत्रकार युवराज पाटील, अध्यापक रावसाहेब शिंदे, अध्यापक एकनाथ कुंभार, सामाजिक कार्यकर्ते संभाजी नाळे, दिलीप पाटील (साबळेवाडी), दयानंद जाधव, संदीप सुतार, सावर्डे दुमाला ग्रा.पं.सदस्य पंढरीनाथ मोहिते, तेरसवाडी सरपंच बबन कदम, चाफोडी ग्रा.पं सदस्य साताप्पा सुर्वे आदी उपस्थित होते.
दरम्यान, चव्हाण कुटुंबियांसाठी ज्यांना मदत करायची असेल त्यांनी मदत करावी, असे आवाहन ‘संवाद’व्हाट्सअप ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे.
——————————————————-