कोल्हापूर • प्रतिनिधी
महानगरपालिका परिसरातील दुकानदारांनी सकाळी सोशल डिस्टन्स न पाळल्याचे दिसून आले. अशा सोशल डिस्टन्स न पाळलेल्या ६ दुकानदारांना दंड करण्यात आला. त्यांच्याकडून प्रत्येकी १००० रूपये प्रमाणे एकूण ६००० रूपये दंड वसूल करण्यात आला.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्स पाळणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक गोष्टींचा भंग केल्याबददल महानगरपालिकेच्या भरारी पथकाकडून सहा दुकानदारांना प्रत्येकी १००० रुपये दंड करण्यात आला. यामध्ये घनशामदास कांतीलाल, आदित्य हर्बल, बावडेकर, विठ्ठल वेंगुर्लेकर, राज एन्टरप्रायजेस, मणेर पेन्ट यांच्याकडून प्रत्येकी १००० रूपये प्रमाणे ६००० रूपये दंड वसूल करण्यात आला.