कोल्हापूर • प्रतिनिधी
महापालिकेच्या भरारी पथकाने दि. १३ व १४ मार्च रोजी मास्क व सॅनिटायझर न वापरणे, सामाजिक अंतर न पाळणे अशा ८ खाजगी क्लासेसवर व २ दुकानांवर दंडात्मक कारवाई करुन प्रत्येकी १०००/- रुपये दंड करण्यात आला.
शहरामधील नागरीकांना व दुकानांना वेळोवेळी सूचना देऊनही मास्क व सॅनिटायझर न वापरणे, सामाजिक अंतर न पाळणाऱ्या दुकानांवर व खाजगी क्लासेसवर कारवाई करुन दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. यामध्ये शाहूपुरी येथील एस.एम.पटेल, लखन हिरो होंडा स्पेअर पार्ट या दुकानावर कारवाई करुन हे दुकान एक तासासाठी बंद करुन प्रत्येकी एक हजार रुपये दंडची कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे शाहू मैदान येथील खाजगी चाटे क्लासेस, शिवाजी पेठ येथील भोजणे क्लासेस, टाकाळा येथील यश ॲकॅडमी, महाद्वार रोड येथील विवेकांनद ॲकॅडमी, बेलबाग येथील गॅलक्सी ॲकॅडमी, निवृत्ती चौक येथील यज्ञपवीत क्लासेस, फिरंगाई येथील ॲपेक्स क्लासेस, ए.पी.सायन्स ॲकॅडमी याठिकाणी सोशल डिस्टंन्स न ठेवल्यामुळे प्रत्येकी रु. १०००/- ची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथक प्रमुख पंडित पोवार, मार्केट इन्स्पेक्टर राजेंद्र पाटील, सज्जन नागलोत, रविंद्र कांबळे आदी उपस्थित होते.