ऑफिसमध्ये विनामास्क आढळलेल्या पाच कर्मचाऱ्यांकडून दंड वसूल

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी  
    महानगरपालिकेतील मुख्य इमारतीमध्ये मास्क न वापरणे, मास्क अर्धवट घालणाऱ्या महानगरपालिकेच्या ५ कर्मचाऱ्यांवर प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दंडाची कारवाई करुन १६०० रुपये दंड वसूल केला. 
    महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये पवडी अकौंट विभागातील व नगरसचिव विभागातील काही कर्मचारी विनामस्क व अर्धवट मास्क घालून वावरत असल्याचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी तात्काळ आरोग्य निरिक्षक यांना सदरच्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. यामध्ये नगरसचिव कार्यालयातील प्रविण लाड, भगवान चौगुले तर पवडी अकौंटमधील चंद्रकांत पाटील, जितेंद्र माने, तानाजी बोंगाळे यांचा समावेश आहे. यामध्ये मास्क न वापरणाऱ्यांना दोन कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ५०० रुपये व अर्धवट मास्‍क घालणाऱ्यां तीन कर्मचाऱ्यांच्याकडून प्रत्येकी २०० रुपये दंड करण्यात आला. या धडक कारवाईमुळे मास्क न वापरणाऱ्यां कर्मचाऱ्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. मास्कबाबत सर्वांना नियम सारखेच असल्याचे प्रशासक बलकवडे यांनी पुन्हा दाखवून दिले आहे.
      सदरची कारवाई आरोग्य निरीक्षक शुभांगी पवार ,माहिती शिक्षण व संवाद अधिकारी निलेश पोतदार कर्मचारी तानाजी शिंदे यांच्यामार्फत करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!