दूध संस्‍था कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा

Spread the love


कोल्‍हापूर • प्रतिनिधी
    कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ)च्‍या सहकार्याने कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संस्‍था कर्मचारी संघटनेने कोविड – १९ निधी उभारण्‍यात आला असून या योजनेत सहभाग घेतलेल्‍या प्राथमिक दूध संस्‍थांमध्‍ये काम कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई पोटी रुपये ९ लाख ५० हजार रूपयांचे वाटप गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील यांच्‍या हस्‍ते व संचालक मंडळाच्‍या उपस्थितीत ताराबाई पार्क येथील कार्यालयात करण्‍यात आले.
    या कोरोना कवच निधीसाठी चेअरमन रविंद्र आपटे व संचालक मंडळ यांच्‍या सहकार्याने गोकुळ दूध संघाने १५ लाख इतकी आर्थिक मदत दिली असून,योजनेत सहभाग घेणेसाठी संघटनेने संस्‍था कर्मचाऱ्यांकडून प्रत्‍येकी ३०० रूपये तर दूध संस्‍थेकडून प्रति कर्मचारी ३०० रूपये इतका निधी घेतला आहे. या योजनेंतर्गत  एखाद्या कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्‍यास त्‍यावरील उपचाराकरीता शासकीय रुग्णालयात उपचारासाठी  १०,००० रूपये तर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी रुपये ३०,००० रूपये व दुर्देवाने कोरोनामुळे कर्मचाऱ्याचा मृत्‍यु झाल्‍यास रुपये एक लाख रुपये, इतर शस्‍ञक्रीयेसाठी १५,००० रूपये तर नैसर्गिक किंवा इतर कारणांमुळे मृत्‍यु झाल्‍यास २५,००० रूपये इतकी नुकसान भरपाई दिली जाते . यामध्‍ये जिल्‍ह्यातील दूध संस्‍थेमधील ४१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्‍यामुळे उपचाराकरीता एकुण ६ लाख २० हजार रुपये या पैकी एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्‍यु झाल्‍यामुळे एक लाख रुपये असे एकूण ७ लाख २० हजार , इतर शस्‍ञक्रीयेसाठी २ कर्मचाऱ्यांना ३०,००० रूपये  व नैसर्गिक किंवा इतर कारणांमुळे ८ कर्मचाऱ्यांचा मृत्‍यु झाल्‍यामुळे प्र‍त्‍येकी २५,००० रूपये प्रमाणे  २,००,००० रूपये असे एकूण ९ लाख ५० हजार इतक्‍या रक्‍कमेचे वितरण करण्‍यात आले व सेवा निवृत्‍त तीन कर्मचाऱ्यांचा सत्‍कार करण्‍यात आला.
    यावेळी कार्यक्रमाचे अध्‍यक्ष रणजितसिंह पाटील, माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक विश्‍वास पाटील, अरुण डोंगळे, जेष्‍ठ संचालक विश्‍वास जाधव, संचालक बाळासो खाडे, उदय पाटील, संचालिका सौ.अनुराधा पाटील, कार्यकारी संचालक डी.व्‍ही.घाणेकर, बोर्ड सेक्रटरी एस.एम.पाटील, दूध संस्‍था कर्मचारी संघटनेचे अध्‍यक्ष  के.डी.पाटील, उपाध्‍यक्ष शामराव पाटील, जनरल सेक्रेटरी विश्‍वास पाटील, दत्‍तात्रय बोळावे, सुभाष गुरव इतर अधिकारी संस्‍था प्रतिनिधी उपस्थिती होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!