अग्निशमन विभागाकडून शोध व बचावाची प्रात्यक्षिके


कोल्हापूर • प्रतिनिधी
     सावित्रीबाई फुले हॉस्पीटल येथे सोमवारी अग्निशमन विभागाकडून शोध व बचावाची प्रात्यक्षिके घेण्यात आली. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे व उप-आयुक्त निखील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन विभागाकडून शोध व बचावाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.  
     यावेळी रुग्णालयात आपत्कालीन घटना घडलेस कशाप्रकारे बचाव करावा याबाबत रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, नागरीकांना प्रत्यक्ष घटना घडलेचे भासवून रोप रेस्क्यु, लॅडर रेस्क्यु, करुन आगीच्या ठिकाणी अडलेल्या लोकांना वाचवण्याचे व वेगवेगळया आगी विझविणेचे प्रात्यक्षिके घेण्यात आली. प्रात्यक्षिकवेळी वेगवेगळया टिम तयार करुन घटना घडलेस कोणी कोणत्या प्रकारे कसे काम करावयाचे याचे मार्गदर्शन देण्यात आले.
      या प्रात्यक्षिकाचे वेळी सहा-आयुक्त संदीप घारगे, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, उप-मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, स्थानक अधिकारी मनिष रणभिसे, दस्तगीर मुल्ला, कांता बांदेकर, जयवंत खोत, ओंकार खेडकर, रवि ठोंबरे, प्रमोद मोरे, अभय कोळी इत्यादी अग्निशमन जवान तसेच सावित्रीबाई फुले हॉस्पीटलचे प्रशासकीय अधिकारी डॉ.पावरा इतर विभागाचे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, नागरीक मोठया संखेने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *