अग्निशमन विभागाच्यावतीने शोध व बचावाची प्रात्यक्षिके


कोल्हापूर • प्रतिनिधी
     महानगरपालिका अग्निशमन विभागाच्यावतीने प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, उप-आयुक्त निखील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी डॉ. द्वारकानाथ कोटणीस आयसोलेशन हॉस्पीटल येथे अग्निशमन विभागाकडून शोध व बचावाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
     यावेळी रुग्णालयात आपत्कालीन घटना घडल्यास कशाप्रकारे बचाव करावा याबाबत रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, नागरीकांना प्रत्यक्ष घटना घडल्याचे भासवून वेगवेगळया आगी विझविण्याची प्रात्यक्षिके घेण्यात आली. यावेळी वेगवेगळया टिम तयार करुन घटना घडल्यास कोणी कोणत्याप्रकारे कसे काम करावयाचे याचे मार्गदर्शन देण्यात आले.
      सदर प्रात्यक्षिकाच्यावेळी आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, उप-मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, प्रशासकीय वैद्यकिय अधिकारी डॉ. रमेश जाधव, डॉ. विजय मुसळे, डॉ. मनिषा चव्हाण, डॉ. शितल वाडेकर, स्थानक अधिकारी मनिष रणभिसे, दस्तगीर मुल्ला, सुनिल वाईंगडे, विशाल चौगुले, कांता बांदेकर, जयवंत खोत, प्रमोद मोरे, अभय कोळी, अग्निशमन जवान तसेच डॉ. द्वारकानाथ कोटणीस आयसोलेशन हॉस्पीटलचे इतर विभागाचे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *