प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण

Spread the love

                                            
कोल्हापूर • प्रतिनिधी
     प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ प्रकल्प येथील कार्यस्थळावर संघाचे चेअरमन विश्वास नारायण पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.   
     यावेळी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्‍यांनी यावेळी संघाचे अधिकारी, कर्मचारी, दूध उत्‍पादक शेतकरी, वितरक व ग्राहक, वाहतूक ठेकेदार यांना प्रजासत्ताक दिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.
      संघाचे ताराबाई पार्क येथील आवारात संचालक अभिजीत तायशेटे यांच्या हस्ते ध्‍वजारोहण करण्यात आले. तसेच जिल्‍हातील विविध ठिकाणी असणाऱ्या संघाच्‍या दूध शितकरण केंद्रावरही राष्‍ट्रध्‍वजाचे ध्‍वजारोहण करण्यात आले.
गोगवे चिलिंग सेंटर येथे संचालक अमरसिंह पाटील, गडहिंग्‍लज चिलिंग सेंटरला संचालक नविद मुश्रीफ, बिद्री चिलिंग सेंटर येथे संचालक नंदकुमार ढेंगे, शिरोळ चिलिंग   सेंटरला संचालक डॉ. सुजित मिणचेकर, तावरेवाडी चिलिंग सेंटरला संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, महालक्ष्‍मी पशुखाद्य कारखाना कागल येथे संचालक किसन चौगले व मुडशिंगी येथील पशुखाद्य कारखाना ये‍थे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांच्‍या हस्‍ते ध्वजारोहण करण्यात आले.
      यावेळी संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील, व्यवस्थापक-प्रशासन डी.के.पाटील, सुरक्षा अधिकारी कुंडलिक कदम तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!