• पंडित जवाहरलाल नेहरूंना अभिवादन
कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयात सहकार ध्वजारोहण कार्यक्रम तसेच देशाचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन करण्यात आले.
६८ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त बँकेचे संचालक व खा. प्रा. संजय मंडलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. तसेच देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजनही मान्यवरांच्या हस्ते झाले.
या संयुक्त कार्यक्रमाला संचालक आर. के. पोवार, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, आसिफ फरास, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.