कोल्हापूर • (जिमाका)
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७२ व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमास अपर जिल्हाधिकरी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.