महापालिकेच्यावतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने आज कर्मवीर विठठल रामजी शिंदे चौकात महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
     यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त रविकांत आडसूळ, सहा.आयुक्त संदीप घार्गे, विनायक औंधकर, विद्यादेवी पोळ, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, नारायण भोसले, परवाना अधिक्षक राम काटकर, नगरसचिव सुनिल बिद्रे, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, पर्यावरण अभियंता समिर व्याघ्राबंरे, केएमसी कॉलेजचे प्राचार्य अरुन पोडमल, मुख्याध्यापिका सौ.अंजली जाधव, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थीनी, अग्निशमन दलाचे जवान, अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
       ध्वजारोहण कार्यक्रमापुर्वी भारताच्या संविधानामधील उद्देशिका यांचे सामुहिक वाचन विजय वणकुंद्रे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!