सहकार सप्‍ताहनिमित्त गोकुळमध्‍ये ध्‍वजारोहण

Spread the love


कोल्‍हापूर • प्रतिनिधी
      १४ ते २० नोव्‍हेंबर २०२१ या कालावधीत संपन्‍न होणाऱ्या ६८ व्‍या अखिल भारतीय सहकार सप्‍ताहनिमित्त गोकुळतर्फे संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्‍या आवारात संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांचे हस्‍ते सहकार ध्‍वजाचे ध्‍वजारोहण करुन सहकार प्रतिज्ञा म्‍हणण्‍यात आली. यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान स्‍वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरु यांच्‍या जयंतीनिमित्त त्‍यांच्‍या प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले.  
      यावेळी चेअरमन विश्‍वास पाटील म्‍हणाले की, संघातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपले काम प्रामाणिकपणे केले पाहिजे. यामुळे स्वत:ची व संस्थेची, दूध उत्पादकांची यातून प्रगती होणार आहे. सहकारामुळे कोल्‍हापूर जिल्‍ह्याचा विकास झाला आहे. यावेळी त्यांनी जिल्‍ह्यातील सर्व सहकारी दूध संस्‍था, दूध उत्‍पादक,अधिकारी व कर्मचारी यांना सहकार सप्‍ताह व बालदिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.पी. पाटील यांनी केले. आभार जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील यांनी मानले.
      यावेळी संघाचे जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, कुंभी बँकचे व्हा. चेअरमन अरुण पाटील, महालक्ष्‍मी पशुखाद्य व्‍यवस्‍थापक व्‍ही. डी. पाटील, पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ. यु.व्‍ही. मोगले, संकलन व्‍यवस्‍थापक एस.व्‍ही. तुरंबेकर, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!