• ना. हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने पूरग्रस्तांना मदत
कोल्हापूर • प्रतिनिधी
निसर्गाच्या प्रकोपाने चिकोत्रा खोऱ्यावर अस्मानी संकट कोसळले. शेतातील पिके डोळ्यादेखत जमिनदोस्त झाली. शेकडो घरांच्या भिंती पडल्या तरी मुश्रीफ फौंडेशनने माणूसकीरुपी भिंत अभेद्य ठेवून पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. चिकोत्रा खोऱ्याला पराक्रमाचा वारसा असून या संकटावरही मात करुन पुरग्रस्त पुन्हा नव्याने उभारतील असा आत्मविश्वासरुपी आशावाद गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
गलगले, नानीबाई चिखली, खडकेवाडा, करड्याळ व अर्जुनवाडा या ठिकाणच्या पूर परिस्थितीची पाहणी व स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
नवीद मुश्रीफ पुढे म्हणाले, गोरगरीब जनतेच्या संकटकाळात त्यांच्या मदतीसाठी नेहमीच नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने आम्ही अग्रेसर आहोत. निसर्गाच्या या प्रकोपात अनेकांच्या घरादारांसह शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनस्तरावर या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून कोणताही पूरबाधित ग्रामस्थ वंचित राहू नये, याची दक्षता शासकीय यंत्रणेने घ्यावी. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे शासन गोरगरीब, दीनदलित नागरिकांना संकट काळात दिलासा देण्याचे काम करेल, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी तलाठी नितीन पाटील, सौ. उमा कारंडे, प्रदीप कांबळे, ग्रामसेवक जालंधर बुवा, विवेकानंद पाटील, कागल तालुका संघाचे संचालक डी. पी. पाटील, विकास पाटील- कुरुकलीकर, काका पाटील, मारुती मगदूम, दामू बांबरे, बाळासाहेब पाटील, बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीण भोसले, अरुण भोसले, सरपंच सौ. छाया चव्हाण, श्रीशैल नुल्ले, सदाशिव तुकान, सरपंच सौ. रेश्मा पोवार, संदीप खोत, मकबूल मकानदार, युवराज जाधव, भरत सातवेकर, विशाल कुंभार, टी. जी. पाटील, बळीराम मोरे, संजय सातवेकर तसेच सरपंच टेपुगडे, शशिकांत पाटील, आनंदा कुंभार, सुरेश मोरबाळे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत सागर मांगले यांनी केले. प्रास्ताविक सतीश घोरपडे यांनी तर आभार सचिन स्वामी यांनी मानले.
——————————————————- Attachments area