कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिकस्थळी शासनाच्या निर्देशाप्रमाणे नियम पाळून सहकार्य करा: प्रशासक डॉ. बलकवडे

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
    कोव्हीडचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व धार्मिकस्थळी शासनाच्या निर्देशाप्रमाणे नियमाचे पालन करून प्रार्थना, नमाज व दर्शन द्यावे, असे आवाहन प्रशासक डॉ. कांदबरी बलकवडे यांनी केले. राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरु झालेने धार्मिक स्थळावरील होणारी गर्दी कमी करण्यासाठी शहरातील सर्व मंदीर, मस्जिद, चर्च, धार्मिक संस्था प्रमुख/प्रतिनिधी यांची बैठक  महापालिकेने आयोजीत केली होती.
     प्रारंभी उपायुक्त निखिल मोरे यांनी धार्मिक स्थळी कोव्हीड-१९ नियमांचे पालन होत नसलेचे सांगितले. धार्मिक स्थळी प्रवेश देताना मास्क, सॅनिटाईझर बंधनकारक करा. शासनाच्या सुधारीत आदेशाप्रमाणे धार्मिक स्थळी कोणतेही धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमास परवानगी असणार नाही. लसीकरणाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी त्यांचे रजिस्टेशन आपल्या धार्मिकस्थळी करता आले तर तशी सुविधा उपलब्ध करुन द्या.
   प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी धार्मिकस्थळी प्रवेश देताना थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी करा. शासनाच्या निर्देशानुसार मर्यादीत लोकांव्यतिरिक्त इतर मोठे कोणतेही कार्यक्रम घेता येणार नाही. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करा. धार्मिकस्थळी प्रवेश देताना सोशल डिस्टंन्सचे पालन केले जात नाही. प्रवेश देण्याच्या ठिकाणी मार्किंग करा. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यास धार्मिक स्थळी परिस्थितीची सुधारणा न झाल्यास कडक निर्बंध करावे लागतील. प्रौढांनी व व्याधीग्रस्तांनी लसीकरण करुन घेण्याबाबत आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती द्या. थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी करताना काही संशय आल्यास तातडीने त्यांना टेस्टींगसाठी पाठवा. यासाठी महापालिकेच्या आरोग्य टिमशी संपर्क करा.
     वायल्डर मेमोरियल चर्चचे आनंद म्हाळुंगेकर यांनी चर्चच्या परिसरात असे बोर्ड लावू. त्याचबरोबर धर्मगुरुंच्या माध्यमातून लसीकरणाबाबत प्रार्थनावेळी आवाहन करु असे सांगितले.
     शाहूपूरी जैन मंदीरचे प्रफुल चमकले यांनी शाहूपूरी येथे जैन मंदीरामध्ये लसीकरणासाठी जागा उपलब्ध करुन देऊ. त्याचबरोबर ऑनलाईन रजिस्टेशनची सुविधा उपलब्ध करुन देऊ असे सांगितले.
     मुस्मिल बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी नमाज पठणावेळी सोशल डिस्टंन्स ठेवू. शुक्रवारी नमाज पठणाला गर्दी होऊ नये याची दक्षता घेऊ. लसीकरणाबाबत धर्मगुरुंच्या मार्फत सर्वांना आवाहन करु. सुचनांचे बोर्ड लावू, असे सांगितले.
     पश्चिम देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी अंबाबाई मंदीरात प्रवेश देताना सर्व नियमांचे पालन करुन प्रवेश दिला जातो. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता आम्ही मंदीराची वेळ कमी केली आहे. मास्क असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासूनच आत सोडले जाते. कोरोना काळात महापालिकेने चांगले काम केले आहे. देवस्थान समितीचा देवल क्लब येथील हॉल लसीकरणासाठी उपलब्ध करुन देऊ. मंदीराबाहेरील गर्दी कमी करण्यासाठी दोन विशेष गार्ड आजपासून नेमू. त्याठिकाणीही पट्टे मारुन सोशल डिन्टंन्सचे पालन करुन मगच मंदीर परिसरात प्रवेश देऊ. देवस्थान समितीद्वारे येणाऱ्या भाविकांचे प्रबोधन करु. देवस्थान समिती जी काही मदत लागेल ती सर्व करेल.
     यावेळी जैन बोर्डिंगचे सुर्यकांत पाटील, सुरेश रोटे, शाहूपूरी जैन मंदीरचे किरण डुणूंग, मुस्लिम बोर्डिंगचे कादर मलबारी, शकिल नगाजी, मौलाना सयद, मौलाना कासाद, माजी नगरसेवक ईश्वर परमार, संभवनाथ गुजरी मंदीरचे नरेंद्र ओसवाल, राजेश ओसवाल,  ख्राईस्ट चर्च (केडीसी)चे  रेव्ह. भालचंद्र मोरे, खजिनदार सचिन थोरात, सेक्रेटरी डॉ.सुशिल कांबळे, अनिल अष्टेकर, सतिश कांबळे, संजय भोसले, सतीश आयरन, सात्विक समुद्रे, इम्तीयाज पन्हाळकर, जुबेर सर्जेखान, ऑल सेंट चर्चचे रेव्ह.एस गोगटे, उत्तम भालकर, देवस्थान समितीचे सेक्रेटरी विजय पोवार आदी उपस्थित होते.  

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!