शालेय शुल्क कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात करावी

Spread the love

• युवासेनेची मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे मागणी
कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोरोनाकाळात खाजगी शाळांच्या शुल्कात कपात करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करून पालक आणि विद्यार्थी वर्गाला दिलासा द्यावा, अशा आशयाचे निवेदन आज युवासेना कोल्हापूर शहरच्यावतीने शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना ई मेलव्दारे पाठविण्यात आले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आम. राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार ई-मेलव्दारे हे निवेदन पाठविण्यात आले आहे.
      निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्याकाळात खाजगी शाळांच्या शुल्कात कपात करण्याचा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. गेल्या वर्षभरापासून राज्यातील शाळा बंद आहेत. कायद्यानुसार शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्याना न पुरविलेल्या सुविधांबाबत ते शुल्क आकारू शकत नाहीत. अशा परिस्थितीतही शुल्काची मागणी करणे म्हणजे नफेखोरी आणि व्यापारीकरण करण्याचाच प्रकार आहे. सन २०२० – २१ या शैक्षणिक वर्षात बराच काळ लॉकडाऊनची परिस्थिती आहे. या काळात शाळा बंदच असल्याने त्यांचा वीज, व्यवस्थापन, देखभाल, पाणीपट्टी, स्टेशनरी आणि इतर अनेक गोष्टींवरील खर्च निश्चितच वाचला असणार त्यामुळे शाळांनी शुक्ल कपात करणे आवश्यक आहे, असल्याचा निर्णय मे.न्यायालयाने दिला आहे.
      महाराष्ट्र राज्यात खाजगी शाळांकडून कोरोनाकाळात केवळ ऑनलाईन शिक्षण देत इतरही शुल्क वसूल केले जात असल्याच्या अनेक तक्रारी वर्षभरात अनेक पालक संघटना, विद्यार्थी संघटना यांनी शालेय शिक्षण विभागाकडे केल्या आहेत. शालेय शुल्काबाबत असलेले कायदे प्रभावी नसतील तर, राज्य शासनास वेगळे कायदे करण्याचा अधिकार असतानाही यासाठी राज्यभरातून असंख्य सूचना देवूनही साधा अध्यादेश शालेय शिक्षण विभागाने काढला नाही. याबाबत पालकवर्गात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तरी वरील बाबींची आपल्या स्तरावर उचित दखल घेवून, कोरोनाकाळात खाजगी शाळांच्या शुल्कात कपात करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी होवून पालक वर्गास दिलासा देण्याची देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घ्यावा, अशी आग्रही मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
      जिल्हा समन्वयक योगेश चौगुले,
जिल्हा सरचिटणीस अविनाश कामते,
शहरप्रमुख चेतन शिंदे, पियुष चव्हाण, विश्वदीप साळोखे, शहर समन्वयक गुरू लाड, विधानसभा समन्वयक शैलेश साळोखे, आय.टी.सेना शहर अधिकारी सौरभ कुलकर्णी आदींसह युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांनी हे निवेदन पाठविले आहे.
———————————————– शालेय शुल्क कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात करावी

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!