कोराना प्रतिबंधाचे नियम पाळू व लॉकडाऊन टाळू’

• कोल्हापूर चेंबर व सर्व संलग्न संघटनांचा निर्धार
कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोरोना या संसर्गजन्य रोगाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. त्यासंदर्भात, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोमवारी (दि.२२) कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक व व्यापारी संघटनांचे पदाधिकारी यांची बैठक झाली. त्या बैठकीमधील सुचना व मार्गदर्शनाबाबत विचारविनियम करण्यासाठी व कोरोना रोखण्यासाठी पुढील प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे मंगळवारी (दि.२३) शिवाजीराव देसाई सभागृह येथे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या पदाधिकारी, सर्व संचालक मंडळ व सर्व संलग्न संघटनेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या बैठकीचे आयोजन केले होते.
    या बैठकीमध्ये ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ ही मोहीम कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व संलग्न संघटनांतर्फे सक्षमपणे पुन्हा एकदा राबविली जाणार. तोंडाला मास्क नाही तर दुकानात प्रवेश नाही, दुकानात योग्य सामाजिक अंतर राखावे व ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना सॅनिटाईज करावे. या त्रिसुत्रीकरणाचा अवलंब करावा असे ठरले.
     यावेळी उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार व संजय पाटील, मानद सचिव धनंजय दुग्गे व जयेश ओसवाल, खजानिस हरिभाई पटेल व माजी अध्यक्ष प्रदिपभाई कापडिया यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या सुचना केल्या.
     या बैठकीस मानद सचिव वैभव सावर्डेकर, संचालक प्रशांत शिंदे, राहूल नष्टे, अजित कोठारी, संपत पाटील, संभाजी पोवार, अनिल धडाम, अविनाश नासिपुडे, शिवानंद पिसे, हितेंद्र पटेल व सिमा शहा तसेच गोशिमाचे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्वल नागेशकर, बबन महाजन व संदिप वीर उपस्थित होते.
———————————————– Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *