कोल्हापूर • प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या सात वर्षपूर्तीबद्दल कोल्हापूर शहरात भारतीय जनता पार्टीच्यावतीने विविध सेवाकार्याचे कार्यक्रम होत असून आज भाजपा कार्यालय येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर शहरातील लसीकरण केंद्रांमधील आशावर्कर महिलांना धान्यकीटचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस हेमंत आराध्ये, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत, उपाध्यक्ष मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, लक्ष्मीपुरी मंडल अध्यक्ष विवेक कुलकर्णी, डॉ.राजवर्धन, आप्पा लाड,आसावरी जुगदार, अमर साठे, धीरज पाटील यांची उपस्थिती होती.