फुटबॉल प्रशिक्षक एआयएफएफ डी  लायसन्स सर्टिफिकेट कोर्स उत्साहात

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर स्पोर्ट्‌स्‌ असोसिएशनच्यावतीने व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्या मार्गदर्शनानुसार फुटबॉल प्रशिक्षक यांच्यासाठीचा एआयएफएफ डी लायसन्स सर्टिफिकेट कोर्स नुकताच उत्साहात संपन्न झाला. हा कोर्स न्यू पॅलेसच्या पोलो ग्राऊंड व केएसएच्या छत्रपती शाहू स्टेडियम येथे घेण्यात आला.
      फुटबॉल खेळाचा प्रसार सर्वत्र होण्यासाठी उत्तम प्रशिक्षक निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या प्रशिक्षणाचे आयोजन एआयएफएफ, न्यू दिल्ली यांच्यामार्फत करण्यात येते. कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशन (केएसए)चे अध्यक्ष व विफाचे उपाध्यक्ष श्रीमंत मालोजीराजे छत्रपती आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या महिला समिती सदस्य व विफाच्या महिला फुटबॉल समिती चेअरमन सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापूरात या कोर्सचे आयोजन करण्यात आले. यापूर्वी या कोर्सच्या दोन बॅच झालेल्या असून सध्या कोल्हापूरात डी  लायसन्सचे एकूण ७२ प्रशिक्षक आहेत.
      या कोर्ससाठी कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण २४ प्रशिक्षकांनी समावेश होता. त्यामध्ये ६ महिला व १८ पुरूष यांचा समावेश होता. या कोर्ससाठीचे मुख्य प्रशिक्षक प्रशांत सिंग यांनी प्रशिक्षण अभ्यासक्रमाची माहिती दिली. त्यामध्ये रोल ऑफ कोच, कम्युनिकेशन, वॉर्म अप, बॉल फिलींग, ड्रिब्लींग, बॉल कंट्रोल, ॲटॅकींग, गोल किपींग, पास ॲण्ड सपोर्ट प्ले, डीफेंडींग, फ्लॅनिंग ऑफ सेशन, मेथड्‌स्‌ ऑफ कोचिंग, प्रिन्सीपल्स्‌ ऑफ प्ले, एज स्पेसिफिक ट्रेनिंग, इनज्यूरी प्रिवेंटेशन ऍण्ड मॅनेजमेंट, हायजिन, स्पोर्ट्‌स्‌ सेप्टी ॲण्ड इनज्यूरी प्रिवेंटेशन, लॉज ऑफ दि गेम इत्यादि बाबतचे व्हिडिओज्‌, थेरी व मैदानावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक यांचे प्रशिक्षण देण्यात आलेे. यामुळे फुटबॉल खेळाडूंच्या खेळामध्ये आधुनिकरितीने तंत्रशुद्ध विकास होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन प्रशिक्षक यांना मिळाले आहे.
     श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांनी कोर्सचे प्रशिक्षक प्रशांत सिंग यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला. यावेळी सौ. मधुरिमाराजे छत्रपती, केएसएचे सचिव  माणिक मंडलिक, सहसचिव राजेंद्र दळवी, सदस्य दिपक घोडके उपस्थित होते. महाराष्ट्र हायस्कूलने केलेल्या सहकार्याबद्दल क्रीडा प्रशिक्षक प्रदीप साळोखे व त्यांच्या खेळाडूंचे केएसएच्यावतीने आभार मानण्यात आले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!